-
भारताचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. (सर्व फोटो – इस्टाग्राम / साक्षी धोनी)
-
धोनीने आज ४०व्या वर्षात म्हणजेच Fabulous 40मध्ये पदार्पण केले.
-
२०१९ च्या विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. IPL मध्ये धोनी खेळणार होता, पण करोनामुळे तेदेखील लांबणीवर पडलं आहे.
-
देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून धोनी आपल्या रांची येथील फार्महाऊसवर वास्तव्यास आहे.
-
पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत तो छानपैकी निवांत वेळ घालवतो आहे.
-
साक्षीने धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला छान फोटोंच्या आठवणी पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
महेंद्रसिंग धोनीचे काही निवडक फोटो तिने पोस्ट केले आहेत.
-
धोनी आपल्या आई वडिलांसोबत निवांतपणे गप्पा मारतानाचा फोटोही तिने यात पोस्ट केला आहे.
-
"तुझ्या वाढदिवशी, तू आणखी एक वर्ष मोठा झाला आहेस. पांढऱ्या केसांची संख्या थोडी वाढली आहे पण तू पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट आणि गोड स्वभावाचा झाला आहेस", असे साक्षीने लिहिले आहे.
-
"तुझ्या आयुष्यातील आणखी एक वर्ष आपण केक कापून साजरे करूया. पती देव, वाढदिवसाच्या शुभेच्छा", असंही साक्षीने सांगितलं.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली