-
भारतीय सैन्यदलाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळने रोविंग या प्रकारात गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे.
-
२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये अवघ्या काही सेकंदांसाठी दत्तूला पदकाने हुलकावणी दिली होती, यादरम्यान दत्तू चर्चेत आला.
-
घरची बेताची परिस्थिती, आईचं आजारपण या सर्वांवर मात करुन दत्तूने २०१८ आशियाई खेळांमध्ये सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. सध्या करोनामुळे सर्व स्पर्धा बंद आहेत. पण या काळातही दत्तूने बसून न राहता आपल्या शेतात काम करण्याचं ठरवलं.
-
नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या दत्तूची शेती आहे. लॉकडाउन काळात दत्तूने पेरणीपासून शेतीच्या सर्व कामांची जबाबदारी उचलली आहे. (फोटो सौजन्य – दत्तू भोकनळ सोशल मीडिया अकाऊंट)
-
मध्यंतरी खासगी आयुष्यात दत्तूला अनेक वादळांना तोंड द्यावं लागतं…परंतू या सर्वांवर मात करत दत्तू पुन्हा उभा राहिला.
-
घाम गाळून मातीतून मोती मिळवून देणारा एकमेव कारागीर म्हणजे शेतकरी असं दत्तूने आपल्या फेसबूक अकाऊंटवर म्हटलं आहे.
-
लॉकडाउन काळात सर्व व्यापार, उद्योगधंदे ठप्प झालेले असताना शेतकरी वर्ग आपलं काम नित्य-नेमाने करतो आहे.
-
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणं हे दत्तूचं स्वप्न होतं.
-
परंतू करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली आहे, त्यातचं जगभरातली परिस्थिती पाहता पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळवली जाईल की नाही याबद्दलही साशंकता आहे. पण यामुळे हार न मानता दत्तू घराबाहेर पडून शेतीकामातून देशसेवा करतो आहे.

“एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन…”, मराठा आंदोलनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकच माणूस…”