-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो आहे.
-
आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय संघाला अपयश आलं असलं तरीही घरच्या मैदानावर आणि परदेशात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे.
-
विराटच्या आधी धोनी आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानेही याआधी सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा तयार करण्यात या दोन्ही कर्णधारांचा मोठा वाटा आहे.
-
सध्याच्या घडीला भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दादा संघ ओळखला जातो. मात्र काही वर्षांपूर्वी भारतीय संघाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या संघांसमोर भारत लगेच शरणागती पत्करायचा.
-
आज आपण भारताला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा हरवणाऱ्या ३ संघांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
१) ऑस्ट्रेलिया – कांगारुंविरुद्ध भारताने आतापर्यंत १४० वन-डे सामने खेळले आहेत, ज्यात ७८ सामन्यांत भारताला पराभव स्विकारावा लागला आहे तर ५२ सामन्यांत भारत जिंकला आहे.
-
२) पाकिस्तान – भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या पाकिस्ताननेही आतापर्यंत भारताला ७३ वेळा हरवलं आहे. १३२ सामन्यांत भारत आतापर्यंत फक्त ५५ वन-डे सामने जिंकू शकला आहे.
-
३) वेस्ट इंडिज – आतापर्यंत १३३ आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाला विंडीजकडून ६३ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत