-
क्रिकेटचा सामना म्हटलं की फलंदाजाला मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करताना पाहणं सर्वांना आवडतं.
-
टी-२० क्रिकेटच्या आगमनानंतर तर प्रत्येक फलंदाज मैदानात फटकेबाजी करत उपस्थित प्रेक्षकांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतो.
-
सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांची फटकेबाजी पाहून समोरचा गोलंदाजही बुचकळ्यात पडतो.
-
आज आपण टी-२० क्रिकेटमध्ये २ षटकांत अर्धशतक झळकावण्याची किमया साधणाऱ्या ३ फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
-
१) युवराज सिंह – २००७ टी-२० विश्वचषक, इंग्लंडविरुद्ध सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडची धुलाई करताना युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. या सामन्यात युवराजने १२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. १६ चेंडूत ५८ धावा करणाऱ्या युवराजने या सामन्यात ७ षटकार लगावले होते. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)
-
२) ख्रिस गेल – बिग बॅश लिग स्पर्धेत खेळत असताना ख्रिस गेलने मेलबर्न संघाकडून आक्रमक फटकेबाजी केली होती. अॅडिलेड स्ट्राईकर्स विरुद्ध सामन्यात गेलने १२ चेंडूत अर्धशतक झळकावलं. ७ षटकार आणि २ चौकारांच्या सहाय्याने गेलने या सामन्यात १७ चेंडूत ५६ धावा केल्या होत्या.
-
३) हजरतउल्ला झजाई – अफगाणिस्तान प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळत असताना हजरउल्लानेही ६ चेंडूत ६ षटकार ठोकण्याची किमया साधली होती. या सामन्यात हजरउल्लाने १२ चेंडूत अर्धशतक साजरं केलं. काबुल ज्वानन संघाकडून हजरउल्ला खेळत असताना बल्ख लिजंड्स संघाविरुद्ध १७ चेंडूत ६२ धावा पटकावल्या होत्या. (फोटो सौजन्य – Afghanistan Premier League Twitter)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…