-
भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या चर्चेत असणारी जोडी आहे. (सर्व फोटो – विराट कोहली इन्स्टाग्राम)
-
आघाडीच्या सेलिब्रिटी जोड्यांमध्ये अनुष्का-विराट हा जोडीचं नाव घेतलं जातं.
-
चाहते प्रेमाने या 'हॉट अँड फिट' जोडीला विरूष्का असं संबोधतात.
-
विराट आणि अनुष्का यांनी अनेकदा सोशल मीडियावर लाइव्ह येत आपल्या चाहत्यांशी मनसोक्त संवाद साधला.
-
करोनामुळे शूटिंग आणि क्रिकेटचे सामने बंद आहेत. त्यामुळे विराट-अनुष्का लॉकडाउन काळात जुन्या आठवणींमध्ये रमताना दिसले.
-
आतापर्यंत जुन्या आठवणींचे फोटो शेअर करणाऱ्या विराटने आज एकदम ताजा फोटो शेअर केला.
-
या फोटोमध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील एक बातमी चाहत्यांशी शेअर केली.
-
विराट आणि अनुष्का हे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी विराटने चाहत्यांना दिली.
-
अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून नवीन वर्षात कोहली कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
-
विराट आणि अनुष्काने सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत 'गुड न्यूज' दिली. "जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं.

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य