-
मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉकने चार वर्षांपूर्वी साशा हर्लीसोबत लग्न केलं. (सर्व फोटो instagram/qdk_12 आणि instagram/sashadekock वरुन साभार)
-
साशा ही एक चेअरलिटर होती. एका समान्यामध्ये चेअरलिडींग करण्यासाठी साशा आली होती. या सामन्यातील खेळीसंदर्भीत साशाने डीकॉकचे अभिनंदन केलं आणि येथूनच या दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली.
-
२०१२ साली दक्षिण आफ्रीकेतील स्थानिक क्रिकेट संघ आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सदरम्यान चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचा सामना झाला होता. याच वेळी या दोघांची पहिल्यांदा भेट झाली.
-
यावेळी डीकॉक दक्षिण आफ्रीकेतील हायवेल्ड लायन्सकडून खेळायचा. याच संघाने मुंबईवर विजय मिळवला होता.
-
या सामन्यामधील डीकॉकचा खेळ पाहून साशाने फेसबुकवरुन त्याचे अभिनंदन केलं होतं.
-
हा पाहा साशानेच शेअर केलेला तिच्या चिअरलिडर्स मैत्रिणींबरोबरचा थ्रो बॅक फोटो.
-
साशाने डीकॉकचे फेसबुवरुन अभिनंदन केल्यानंतर या दोघांमध्ये वरचेवर बोलणं होऊ लागलं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
डीकॉक आणि साशाने तीन वर्ष एकमेकांना डेट केलं.
-
पहिल्यांदा भेट झाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१५ साली साशा आणि डीकॉकने एग्नेजमेंट केली.
-
याच वर्षी ख्रिसमसचे गिफ्ट म्हणून डीकॉकने साशाला चक्क एक मर्सिडीज गाडी भेट दिली होती.
-
एन्गेजमेंटनंतर एका वर्षांनी हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.
-
साशा सोशल नेटवर्किंगवर खूप सक्रीय आहे. तिला कुत्रे खूप आवडतात. तिने घरामध्ये अनेक कुत्रे पाळले आहेत.
-
साशा मुंबई इंडियन्सच्या सामन्यांच्या वेळी अनेकदा मैदानामध्ये दिसून येते.
-
डीकॉकही अनेकदा पत्नीबरोबरच फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असतो.
-
या दोघांच्या फोटोवर चाहते अनेकदा कपल गोल्स अशा पद्धतीच्या कमेंट करताना इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतं.

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…