-
शारजाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत संघाला थरारक विजय मिळवून दिला. पंजाबने राजस्थानला विजयासाठी २२४ धावांचं आव्हान दिलं होतं. (फोटो सौजन्य: Twitter/NORBUJOSEPHIN वरुन साभार)
-
पंजाब ने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. (फोटो सौजन्य: Twitter/ESPNcricinfo वरुन साभार)
-
मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर तेवतियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. (फोटो सौजन्य: Twitter/icc वरुन साभार)
-
तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेलं राजस्थान एकदम आघाडीवर आलं. आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी तेवतियाने बरोबरी केली. या खेळीमुळे तेवतिया रातोरात स्टार झाल्याचे दिसत असले तरी हरयाणातील छोट्याश्या गावांमधून दुबईच्या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडणार राहुल तेवतियाचा प्रवास थक्क करणार आहे. (फोटो सौजन्य: Twitter/imrRight999 वरुन साभार)
-
फरीदाबादमध्ये राहणाऱ्या राहुल तेवतियाचे वडील कृष्णपाल तेवतिया हे पेशाने वकील आहेत. (फोटो सौजन्य: Twitter/Anthony_Rdgz72 वरुन साभार)
-
१९९३ साली जन्मलेल्या राहुलने वयाच्या चौथ्या वर्षापासून क्रिकेटची बॅट हातात घेतली. सुरुवातील तो गावातील गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळायचा. लहान वयातच आपल्या मुलाचे क्रिकेटमधील कौशल्यपासून कृष्णपाल यांनी राहुलला बल्लभगड येथील क्रिकेट अकादमीमध्ये टाकलं. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
तिथे काही काळ प्रशिक्षण घेतल्यानंतर राहुल भारताचे माजी क्रिकेटपटू विजय यादव यांच्या अकादमीमध्ये क्रिकेट शिकण्यासाठी गेला. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
हरयाणाच्या रणजी संघात फिरकी गोलंदाज म्हणून राहुल तेवतियाची निवड झाली. त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
२०१३ साली राहुल तेवतियाने कर्नाटकमधील प्राथमिक श्रेणी तर २०१७ मध्ये ओडिशाविरुद्धच्या सामन्यातून ए लिस्टेड क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. (फोटो सौजन्य: Twitter/DelhiCapitals वरुन साभार)
-
राहुल तेवतियाला २०१४ साली आयपीएलच्या लिलावामध्ये राजस्थानने १० लाख रुपयांची बोली लावत विकत घेतले. (फोटो सौजन्य: Twitter/rameshlaus वरुन साभार)
-
तेवतियाला २०१४ मध्ये तीन तर २०१५ मध्ये केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य: Twitter/rajasthanroyals वरुन साभार)
-
२०१४ मध्ये तीन सामन्यांमध्ये त्याने दोन बळी घेतले आणि १६ धावा केल्या होत्या. २०१५ मध्ये राजस्थानकडून एक सामना खेळताना एक विकेट घेतली होती. त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. (फोटो सौजन्य: Twitter/Ranshsingh5 वरुन साभार)
-
२०१६ मध्ये राहुल तेवतिया आयपीएल खेळलाच नाही. (फोटो सौजन्य: Twitter/stLogesh वरुन साभार)
-
२०१७ साली किंग्स इलेव्हन पंजाब संघाने तेवतियाला २५ लाखांची बोली लावून विकत घेतले. मात्र यावेळीही त्याला फारशी संधी मिळाली नाही. तो केवळ तीन सामने खेळला. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
सुरुवातीच्या ११ सामन्यांमध्ये पंजाबने तेवतियाला संघात म्हणजेच प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नाही. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
२०१७ साली १२ व्या सामन्यात कोलकाता नाइटरायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबने संधी दिली. या संधीचे सोने करत तेवतियाने तीन बळी घेतले. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
२०१८ साली दिल्ली डेअरडेविल्सने (आता दिल्ली कॅपिटल्स) तब्बल तीन कोटी रुपयांची बोली लावत तेवतियाला विकत घेतले. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
२०१८ मध्ये तेवतियाने आठ सामन्यांमध्ये सहा तर २०१९ मध्ये पाच सामन्यांमध्ये दोन बळी घेतले. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
दिल्लीने २०२० च्या आयपीएलआधीच तेवतियाला राजस्थान संघाकडे देत त्याबदल्यात अजिंक्य रहाणेला आपल्या संघात घेतले. (फोटो सौजन्य: Twitter/itsDhoniArmy वरुन साभार)
-
पंजाबसाठी ज्याप्रमाणे त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती तशीच तो आताही करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
पंजाबमधून खेळताना स्वत:ची वेगळी ओळख बनवणाऱ्या तेवतियाने रविवारी पंजाबलाच धूळ चारली. (फोटो सौजन्य: Twitter/rahultewatia02 वरुन साभार)
-
तेतवियाच्या मोबदल्यात दिल्लीने रहाणेला संघात जागा दिली असली तरी रहाणेला अद्याप दिल्लीने संधी दिलेली नाही तर दुसरीकडे तेवतिया मात्र हिरो ठरला आहे. (फोटो सौजन्य: Twitter/mairajhabib2 वरुन साभार)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’