पंजाब संघातील ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या भारतीय प्रेयसीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. -
मॅक्सवेलच्या होणाऱ्या बायकोला एका नेटकऱ्याने मॅक्सवेलला सोडून एखाद्या भारतीय तरुणासोबत लग्न कर असा सल्ला दिला… त्यानंतर मॅक्सवेलच्या प्रेयसीनं त्या नेटकऱ्याला आपल्या शब्दाच सुनवलं….
२०२० च्या सुरुवातीलाच मॅक्सवेलने आपल्या साखरपुड्याची बातमी इन्स्टाग्रावरून दिली होती. विनी रमन या भारतीय वंशाच्या मुलीसोबत मॅक्सवेलने वर्षाच्या सुरुवातीलाच साखरपुडा केला आहे. लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मॅक्सवेल आता भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेल आणि विनी रमन मागील दोन ते तीन वर्षांपासून एकमेंकाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहेत. -
विनी रमन.. मॅक्सवेलच्या कुटुंबासोबत
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मॅक्सवेलने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी करत दणक्यात पुनरागमन केलं आहे. माझ्या मानसिक आरोग्यासंदर्भात विनीने मोठी साथ दिल्याचे मॅक्सवेलने जाहिरपणे म्हटले होते. मॅक्सवेलला क्लीन बोल्ड करणारी ही विनी रमन आहे तरी कोण, हे पाहूयात… विनी रमनचा जन्म ३ मार्च १९९३ रोजी मेलबर्नमध्ये झाला. विनी रमनची रास मीन आहे. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले. विनी रमनने मेडिकलमधून शिक्षण घेतलं असून ती पेशानं फार्मासिस्ट ( pharmacist ) आहे. विनीला गोल्फ आणि स्नूकर खेळायला आवडते. तर मार्गरिटा पिज्जा तिचा फेवरेट आहे. विनी रमनला एक बहिण असून मेलबर्नमध्ये ती नर्स म्हणून काम करत आहे. विनीचा आवडता रंग पिंक असून ती कॉफीची चाहतीची आहे. विनीला नवनवीन ठिकाणी फिरायला आणि पोहायला आवडते. एका कार्यक्रमादरम्यान विनी आणि मॅक्सवेलची भेट झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. दोघांच्याही भेटी वाढल्या आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. विनी रमनने आपल्या इन्स्टाग्राम मॅक्सवेलसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुड्यानंतर मॅक्सवेल आणि विनी रमन कधी लग्न करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. (सर्व फोटो विनी रमन यांच्या इंस्टाग्रामवरुन घेतले आहे)

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य