भारतीय कर्णधार विराट कोहलीनं २४२ व्या डावात १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सर्वात वेगवान १२ हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता… पाहूयात विराट कोहलीनं १२ हजार धावापर्यंत कशी मजल मारली आहे.. एक हजार धावा करण्यासाठी विराट कोहलीला २४ डाव लागले होते. ५३ डावांत विराट कोहलीनं दोन हजार धावांचा टप्पा पार केला. तीन हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी विराट कोहलीला ७५ डाव लागले. ९३ डावांत विराट कोहलीनं ४००० धावांचा टप्पा पार केला. ११४ डावांत विराट कोहलीनं पाच हजार धावांचा टप्पा पार केला. १३६ डावांत विराट कोहलीनं सहा हजार धावा केल्या. १६१ डावांत विराट कोहलीनं सात हजार धावांचा टप्पा पार केला. १७५ डावांत ८ हजार धावांचा टप्पा पार केला. १९४ डावात ९ हजार धावांचा टप्पा पार केला. २०५ डावांत विराट कोहलीनं दहा हजार धावांचा टप्पा पार केला. -
२२२ डावांत विराट कोहलीनं ११ हजार धावांचा टप्पा पार केला.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल