-
मतिला राज भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व तिच्याकडे आहे. (सर्व फोटो सौजन्य – मिताली राज इन्स्टाग्राम)
-
जानेवारी २००२ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून मिताली राजने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
-
जून १९९९ मध्ये आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात मिताली राजने एकदिवसीय संघात पदार्पण केले.
-
ऑगस्ट २००६ मध्ये मिताल राजने टी-२० मध्ये डेब्यु केला. मार्च २०१९ मध्ये ती शेवटचा टी-२० सामना खेळली.
-
वनडेमध्ये सलग सात अर्धशतक झळकावणारी मिताली पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
-
मिताली राज आतापर्यंतच्या करिअरमध्ये १० कसोटी सामने, २०९ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामने खेळली आहे.
-
मिताली राजने कसोटीमध्ये ६६३ धावा, वनडे ६,८८८ धावा आणि टी-२० मध्ये २,३६४ धावा केल्या आहेत.
-
मिताली वनडे, टी-२० च्या तुलनेत कसोटी सामने कमी खेळली असली तरी २१४ ही कसोटीमधील तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताकडून कुठल्याही महिल्या क्रिकेटपटूने झळकवलेली ती सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीत एक शतक आणि चार अर्धशतक तिच्या नावावर आहेत.
-
महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिताली राजच्या नावावर सर्वाधिक ६८८८ धावांची नोंद आहे. वनडेमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी ती एकमेव क्रिकेटपटू आहे.
-
महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५३ अर्धशतकांची नोंद मितालीच्या नावावर आहे.
-
२०१८ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत तिला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यावरुन तिने आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याबरोबर झालेला तिचा वादही चांगलाच गाजला होता.
-
मिताली राजला सोशल मीडियावर काही फोटोंवरुन ट्रोलही करण्यात आले होते. पण तिने सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सची बोलती बंद केली होती.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…