भारतीय संघाच्या निवडसमितीच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या अजित आगरकर याचा आज ४३ वा वाढदिवस आहे. ४ डिसेंबर १९७७ रोजी आगरकरचा मुंबईत जन्म झाला. वाढदिवसानिमित्ताने अजित आगरकरच्या कारकीर्दीचा आणि वैयक्तिक आयुषाचा घेतलेला थोडक्यात आढवा… आगकरकडे एक दर्जेदार अष्टपूलै खेळाडू म्हणून स्थानिक क्रिकेटमध्ये पाहिलं जात होतं. पण भारतीय संघानं फलंदाजापेक्षा गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला. आगरकरनं आपल्या फलंदाजीची चुणूक अनेकवेळा दाखवून दिली होती. अजित आगरकर याने १९९८ ते २००७ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्याने २६ कसोटी सामन्यांमध्ये ५७१ धावा केल्या. १९१ एकदिवसीय सामन्यात २८८ विकेट घेतल्या तर १२६९ धावा चोपल्या आहेत. तर ४ टी २० सामन्यात १५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आगरकरचं वैयक्तीक आयुष्यही खूपच रंजक आणि चर्चेत होतं. समाजाचा विरोध झुगारून आगरकरनं फातिमा हिच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांची लव्ह स्टोरी एकदम फिल्मी आहे. मुंबई संघाकडून खेळत असताना आगकर आणि फातिमाचा भाऊ मझहर चांगले मित्र होते. मझहरही मुंबईकडून क्रिकेट खेळायचा आणि अजितचा चांगला मित्र होता. त्याच्याबरोबर फातिमा अनेकदा असायची. त्याचमुळे अजित आणि फातिमाची ओळख झाली होती. पुढे लगेचच २००२ ला त्यांनी कुटुंबाच्या संमतीने लग्न केले. सुरुवातीला आगकर आणि फातिमा यांच्या कुटुंबीयांनी या नाताबद्दल नाराजी व्यक्त केली होती. समाजामध्येही या नात्याबद्दल चर्चा सुरु होती. दोघांचे धर्म वेगवेगळे असल्यानं त्यावेळी बरीच टीका झाली. आगरकर हा मराठी ब्राह्मण, तर फातिमा ही मुस्लीम होती. पण म्हणतात ना… प्रेमाला कशाचेही बंधन नसते…. अखेर आगरकर आणि फातिमा यांनी कुटुंबीयांच्या सहमतीनं ९ फ्रेबुवारी २००२ रोजी लग्न केलं. आगरकर आणि फातिमाला एक मुलगा असून त्याचं नाव राज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असताना सर्वात हँडसम भारतीय क्रिकेटपटू म्हणून आगरकरची वेगळीच ओळख होती. सचिनपासून विराट कोहलीपर्यंत दिग्गज खेळाडूंना न जमलेला विक्रम आगरकरनं करुन दाखवला आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आगरकरनं शतकी खेळी केली आहे. -
आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आगरकरने १६ चौकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी केली. लॉर्ड्सवर शतक झळकवावं असं अनेकांचं स्वप्न असतं मात्र मोठमोठ्या फलंदाजांचं हे स्वप्न साकार झालेलं नाही. यामध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, एबी डीव्हिलियर्स, जॅक कॅलिस, युनिस खानआणि विराटसह अनेक दिग्गज खेळाडूंची नावं आहेत.
-
एकदिवसीय सामन्यात २१ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
-
एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात वेगवान ५० विकेट घेण्याचा विक्रमही आगरकराच्या नावावर आहे. आगरकरनं २३ सामन्यात ५० विकेट घेण्याचा कारनामा केला होता.
-
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा ४ बळी घेण्याचा विक्रम आगरकरच्या नावावर आहे. आगरकरनं १९१ सामन्यात १२ वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
-
सर्व छायाचित्रं अजित आगरकर आणि फातिमा यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन घेतली आहेत…

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?