Yuvraj Singh House : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आपल्या खेळाप्रमाणेच आपल्या लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असतो. युवराज सिंगचं मुंबईतील घर आलिशान आहे…. पाहूयात युवराजच्या घरातील फोटो… युवराज पत्नी हेजलसह मुंबईतील वरळीच्या ओंकार1973 टॉवर्समधील अपार्टमेंटमध्ये राहत आहे. युवराजचं आलिशान घर ओंकार अपार्टमेंटमधील सी विगमध्ये २९ व्या मजल्यावर आहे. याच इमारतीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचेही घर आहे. विराट कोहलीचं अपार्टमेंट ३५ व्या मजल्यावर आहे. युवराज सिंगने संपूर्ण २९ वा मजला खरेदी केला आहे. यामध्ये दोन फ्लॅट आहेत. युवराज सिंगने २०१५ मध्ये ६४ कोटी रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केलं होतं. युवराजच्या घराची किंमत विराट कोहलीच्या घरापेक्षा दुप्पट आहे. विराट कोहलीच्या घराची किंमत ३० कोटी असल्याचं बोललं जात आहे. वरळीतील या आलिशान घरात युवराज पत्नी हेजलसह राहतोय. युवराज सिंग यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सर्व फोटो युवराज सिंग याच्या इन्स्टाग्रम पेजवरुन घेतले आहेत.

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम