-
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा कायमच चर्चेत असतो. त्याची अफलातून फटकेबाजी हा 'गॉसिप'चा विषय असतो. (सर्व फोटो- रोहित शर्मा इन्स्टाग्राम)
-
पण गेल्या काही दिवसांत रोहित शर्माची दुखापत, हॅमस्ट्रिंग आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याचा समावेश हा चर्चेचा विषय झाला आहे.
-
'मुंबई इंडियन्स'च्या संघातून दमदार खेळी करणाऱ्या रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सुरूवातीला स्थान देण्यात आलं नव्हतं.
-
BCCIच्या या निर्णयावरून अनेक तर्कवितर्क लढवले गेले. त्यानंतर अखेर कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले.
-
याचसोबत IPL मध्ये रोहितला आणखी एका गोष्टीमुळे ट्रोल केलं गेलं. ते म्हणजे त्याचं वाढलेलं वजन… (फोटो- IPL.com)
-
रोहितला लठ्ठ, जाड्या अशा वेगवेगळ्या नावांनी चिडवलं जात होतं. विराटच्या फिटनेसशी त्याची तुलना करण्याची संधीही काहींनी सोडली नाही.
-
पण IPLमध्ये रोहितला त्याच्या लठ्ठपणामुळे चिडवणाऱ्यांची रोहितनेच बोलती बंद केली आहे.
-
रोहितने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर काही पोस्ट केलेत. बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत तो सराव करत आहेत तेथील हे फोटो आहेत.
-
NCAमध्ये रोहितने केवळ हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर मात केली नाही तर आपलं वजन कमी करण्याच्या दृष्टीनेही परिश्रम घेतल्याचे दिसत आहेत.
-
रोहितने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला नवा लूक पोस्ट केला आहे. त्यात रोहितचं वजन खूप कमी झाल्याचं आणि तो अधिकच फिट असल्याचं दिसून येत आहे.
-
रोहित सध्या आपल्या तंदुरूस्तीकडे लक्ष देत असून ११ डिसेंबरला रोहितच्या दुखापतीबाबत पुन्हा एकदा BCCIची वैद्यकीय समिती माहिती घेणार आहे.

Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी