तीन दिवसीय सराव सामन्याचा दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी झळकावलेल्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३८६ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल करत ऋषभने धावांचा ओघ वाढवला. एका बाजूने हनुमा विहारी धावफलक हलता ठेवत असताना ऋषभने चांगली फटकेबाजी केली. ७३ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांसह त्याने १०३ धावा केल्या. पंतनं केलेल्या फटकेबाजीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला होता… -
-
-
-
-
-
-
-

Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”