-
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात अडकला आहे. धनश्री वर्मासोबत गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये पारंपरिक हिंदू रिवाजानुसार हा विवाह सोहळा पार पडला. (फोटो सौजन्य – चहल, धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परत आल्यानंतर हा सोहळा पार पडला.
-
चहल शेरवानी आणि फेटा या पोषाखात अत्यंत रुबाबदार दिसत होता, तर धनश्री वर्माचं सौंदर्यही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुलून आलं होतं.
-
धनश्री ही पेशाने कोरिओग्राफर असून चहल आयपीएलला रवाना होण्यापूर्वी दोघांचा साखरपुडा सोहळा पार पडला होता. कालांतराने धनश्री चहलला पाठींबा द्यायला युएईत दाखल झाली होती.
-
विवाहबंधनात अडकण्यासाठी चहल आणि धनश्री सोशल मीडियावर आपले रोमँटीक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होते.
-
चहलचा सहकारी आणि क्रिकेटपटू शिखर धवनने या सोहळ्याला हजेरी लावली होती.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…