-
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करुन ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. (फोटो सौजन्य – BCCI)
-
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत दोन्ही डावांत ऑस्ट्रेलियाला अनुक्रमे १९५ आणि २०० धावांवर गारद केलं.
-
फलंदाजीत कर्णधार अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा यांनी आश्वासक कामगिरी केली. परंतू भारतीय संघासाठी हा प्रवास सोपा नव्हता.
-
पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभवानंतर टीम इंडियावर टीकेची झोड उठत होती. कर्णधार विराट कोहली माघारी परतला होता. मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. अशा परिस्थितीत अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघावर व्हाईटवॉशची नामुष्की ओढवेल असं भाकित वर्तवलं होतं.
-
परंतू टीम इंडियाने या सर्वांचे दात घशात घालत दिमाखात पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले होते माजी खेळाडू…
-
१) मायकल क्लार्क – विराट कोहलीशिवाय पुढील कसोटी सामन्यांत तुम्ही भारतीय बॅटींग लाईनअपचा विचारही करु शकत नाही. टीम इंडिया आता मोठ्या संकटात आहे. (फोटो सौजन्य – AP)
-
२) रिकी पाँटींग – विराट कोहली माघारी परतत असल्यामुळे कदाचीत ऑस्ट्रेलियाकडे ही मालिका ४-० ने जिंकण्याची चांगली संधी आहे. पहिल्या कसोटीत भारत ज्या पद्धतीने हरला आहे ते पाहता यातून त्यांना सावरणारा कोणीही संघात नाहीये. (फोटो सौजन्य – IPL)
-
३) मार्क वॉ – तिसऱ्या दिवशी भारतावर मात केल्यानंतर आता टीम इंडिया या मालिकेत पुनरागमन करेल असं मला अजिबात वाटत नाही. ऑस्ट्रेलिया ही मालिका ४-० ने जिंकत आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
४) मायकल वॉन – मी बोललो होतो ना…भारतीय संघ या मालिकेत ४-० ने पराभूत होईल. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)
-
५) ब्रॅड हॅडीन – भारतीय संघाकडे कसोटी सामना जिंकण्याची एकमेव संधी होती ती फक्त अॅडलेडमध्ये…आता टीम इंडिया पुनरागमन करु शकेल असं मला वाटत नाही. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”