-
अखेरच्या कसोटी सामन्यात नटराजनला दुखापग्रस्त बुमराहच्या जागी स्थान देण्यात आलं. पहिल्या डावांत नटराजन यानं प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. पंरतु दुसऱ्या डावात नटराजन याला एकही बळी मिळवता आला नाही. शिवाय त्यानं सहा नो बॉलही फेकले. नटराजनच्या या कामगिरीवर समालोचन करणाऱ्या शेन वॉर्न यानं दिलेल्या एका प्रतिक्रियेवर सोशल मीडियात प्रचंड गदारोळ माजला आहे.
-
पदार्पणाच्या कसोटीत नटराजन यानं सात नो बॉल फेकले , त्यावरून वॉर्ननं दिलेल्या प्रतिक्रियामुळे नेटकरी खवळले आहे. काहींनी वॉर्न फिक्सिंगचा आरोप करतोय, असा अंदाज बांधून त्याची शाळा घेतली.
-
नटराजननं पहिल्या डावात सहा नो बॉल फेकले आणि चौथ्या दिवशी एक.. यापैकी पाच नो बॉल हे षटकाच्या पहिल्याच चेंडूवर होते. यावरुन शेन वॉर्न यानं समालोचन करताना प्रतिक्रिया दिली…
-
वॉर्न म्हणाला की, ''नटराजन गोलंदाजी करताना एक गोष्ट माझ्या नजरेनं हेरली आहे. त्यानं या सामन्यात सात नो बॉल फेकले आणि क्रीजपासून त्याचा पाय बराच लांब होता.''
-
शेन वॉर्न फॉक्स क्रिकेटवर बोलताना पुढे म्हणाला,''त्यापैकी पाच नो बॉल हे पहिल्याच चेंडूवर फेकले गेले. ही गोष्ट थोडी खटकणारी आहे. आम्ही प्रत्येकानं नो बॉल फेकले आहेत, परंतु षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाच नो बॉल, ही गोष्ट इंटरेस्टींग आहे.''
-
वॉर्नच्या या प्रतिक्रीयेतून कुठेच नटराजनवर फिक्सिंगचा थेट आरोप केला गेला नाही. परंतु, सोशल मिडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. पाहा नेटकरी काय म्हणालेत…
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”