-
आजचा दिवस भारतीय क्रिकेट रसिकांसाठी अवर्णनीय ठरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतासमोर अनेक आव्हानं उभी राहिली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीपासून ते दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतलेल्या खेळाडूंपर्यंत. असं म्हणतात की, सुरूवात चांगली झाली, तर निम्मी मोहीम फत्ते. पण, भारतासोबत उलटच घडलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटूंना धाडसी विधान करण्याची आयती संधीच मिळाली. (फोटो सौजन्य/बीसीसीआय)
-
पहिली कसोटी सुरू होण्याआधीपासूनच ऑस्ट्रेलियासह काही खेळाडूंनी भारताला व्हाइटवॉश मिळणार असल्याची भाकितं केली. पण, भारतीय संघानं या विधानांकडं दुर्लक्ष करत ध्येयावरची नजर हटू दिली नाही. त्याचीच प्रचिती शेवटच्या सामन्यातील निकालाने दिली. (फोटो सौजन्य/बीसीसीआय)
-
‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला. (फोटो सौजन्य/बीसीसीआय)
-
या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत कसोटी मालिकेवर नाव कोरलं. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. (फोटो सौजन्य/बीसीसीआय)
-
त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला. मात्र, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी कोणत्या खेळाडूंनी व्हाइटवॉशबद्दल विधानं केली होती. काय होती त्यांची विधानं… पाहू यात…. (फोटो सौजन्य/बीसीसीआय)
-
मायकल क्लार्क – विराट कोहलीशिवाय पुढील कसोटी सामन्यांत तुम्ही भारतीय बॅटींग लाईनअपचा विचारही करु शकत नाही. टीम इंडिया आता मोठ्या संकटात आहे. (फोटो सौजन्य – AP)
-
रिकी पाँटींग – विराट कोहली माघारी परतत असल्यामुळे कदाचीत ऑस्ट्रेलियाकडे ही मालिका ४-० ने जिंकण्याची चांगली संधी आहे. पहिल्या कसोटीत भारत ज्या पद्धतीने हरला आहे ते पाहता यातून त्यांना सावरणारा कोणीही संघात नाहीये. (फोटो सौजन्य – IPL)
-
मार्क वॉ – तिसऱ्या दिवशी भारतावर मात केल्यानंतर आता टीम इंडिया या मालिकेत पुनरागमन करेल असं मला अजिबात वाटत नाही. ऑस्ट्रेलिया ही मालिका ४-० ने जिंकत आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
मायकल वॉन – मी बोललो होतो ना…भारतीय संघ या मालिकेत ४-० ने पराभूत होईल, वॉनने पहिल्या कसोटी मालिकेतील भारताच्या पराभवानंतर म्हटलं होतं. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)
-
ब्रॅड हॅडीन – भारतीय संघाकडे कसोटी सामना जिंकण्याची एकमेव संधी होती ती फक्त अॅडलेडमध्ये…आता टीम इंडिया पुनरागमन करु शकेल असं मला वाटत नाही. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल