-
(संग्रहित छायाचित्र)
-
‘आयपीएल’चा आगामी हंगाम भारतात होणार की परदेशात हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र हंगाम होण्याबाबत आशावादी आहे.
-
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२०चा ‘आयपीएल’ हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत झाला होता.
-
पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकांद्वारे देशात ‘आयपीएल’ होण्याबाबतची स्पष्टता येऊ शकेल. तसेच ४ फेब्रुवारीपर्यंत संघांसाठी खेळाडू स्थलांतरण व्यवहार प्रक्रिया सुरू राहील.
-
लिलावापूर्वी आठही संघानं काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. करारमुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. लिलावात हे खेळाडू मालामाल होण्याची शक्यता आहे… पाहूयात हे खेळाडू नेमके कोण आहेत?
-
मुजीब उर रहमान – गेल्या तीन हंगामापासून प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा मुजीब उर रहमानला पंजाब संघानं करारमुक्त केलं आहे. तीन वर्षांपूर्वी मुजीबला पंजाबनं ४ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. आता या जादुई फिरकी गोलंदाजाला लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. मुजीबनं बीबीएलमध्ये आपल्या कामिरीनं सर्वांची मनं जिंकली आहेत.
-
स्टिव्ह स्मिथ – राजस्थान रॉयल्सने कर्णधार स्टिव्ह स्मिथला करारमुक्त करत सर्वांनाच धक्का दिला. राजस्थान संघानं स्मिथऐवजी युवा संजू सॅमसनला नेतृत्वाचा काटेरी मुकुट घातला आहे. गेल्या हंगामात स्मिथची कामगिरी सरासरी झाली होती. राजस्थान रॉयल्सनं स्मिथला १२.५ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. करारमुक्त केल्यामुळे स्मिथची किंमत घसरण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या घडीला स्मिथ आघीडा फलंदाज आहे. त्यामुळे त्याला खरेदी करण्यासाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. चेन्नई, आरसीबी आणि दिल्लीचे संघ स्मिथला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे.
-
अॅरोन फिंच – ऑस्ट्रेलिायचा टी-२० संघाचा कर्णधार अॅरोन फिंच याचा गेल्या हंगमातील कामगिरी सुमार राहिली होती. आरसीबीकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात स्मिथ चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, त्याची संथ गतीनं फलंदाजी संघासाठी चिंतेचा विषय ठरला. त्यामुळेच आरसीबीनं फिंचला करारमुक्त केलं. फिंचकडे टी-२० चा तगडा अनुभव आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या लिलावात त्याच्यावर कोट्यवधींची बोली लागण्याची शक्यता आहे.
-
ख्रिस मॉरिस – आरसीबीनं १० कोटी रुपयांना विकत घेतलेल्या ख्रिस मॉरिसला करारमुक्त केलं आहे. दुखापतीमुळे मॉरिस सुरुवातीचे सहा सामने खेळू शकला नव्हता. त्याला होणाऱ्या सततच्या दुखापतीमुळे आरसीबीनं त्याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला. मॉरिसनं दुबईत झालेल्या हंगामात ९ सामन्यात ११ बळी घेतले होते. पंजाबचा संघ मॉरिसला विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
-
शिवम दुबे – आरसीबीनं करारमुक्त केलेल्या शिवम दुबेवरही या लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या या अष्टपैलू खेळाडूनं दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेत आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावीत केलं होतं. शिवाय मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही त्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खणखणीत षटकार लगवण्यामध्ये माहिर असलेल्या शिवम दुबेला लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक