-
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारत भारतीय संघानं बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेवर वर्चस्व मिळवलं. गाबा येथील कसोटी सामन्यातील विजयानंतर जगभरातून भरातीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीवर खूश होऊन बीसीसीसआयनं पाच कोटींचं बक्षीसही जाहीर केलं.
-
या विजयाचं खास वैशिष्ट्य म्हणजे संघातील आघाडीचे खेळाडू विराट कोहली, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या उनुपस्थित युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली.
-
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताच्या युवा ब्रिगेडनं ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. भारतीय संघातील युवा खेळाडूच्या कामगिरीवर उद्योगपती आनंद महिंद्रा खूस झाले आहे. त्यांनी संघातील या युवा सहा खेळाडूंना महिंद्रा थार एसयूवी ( Mahindra Thar SUV) भेट देण्याची घोषणा केली आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
-
दुसऱ्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुबमन गिल यांन आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच प्रभावीत केलं. या मालिकेत शुबमन यानं दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
टी नटराजन यानं आपल्या खेळीनं सर्वांनाच प्रभावीत केलं. नटराजन यानं एकाच दौऱ्यात टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघात पदार्पण केलं. नवदीप सैनीची या सामन्यात कामगिरी सर्वसामान्य झाली होती. मात्र, कर्णधार अजिंक्य रहाणेच्या एका शब्दावर दुखापत झाल्यानंतरही गोलंदाजी केली. शिवाय फलंदाजीसाठीही मैदानात उतरला होती. शार्दुल ठाकूरनं निर्णायक कसोटी सामन्यात कठीण प्रसंगावेळी ६७ धावांची खेळी केली. तसेच सामन्यात सात बळीही घेतले. -
शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद सिराजला मेलबर्न कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. सिरजानं तीन कसोटी सामन्यात १३ बळी घेत आपली निवड सार्थ ठरवली. सिराज भारताकडून या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहेय
रविंद्र जाडेडा दुखापतग्रस्त झाल्यानंतर वॉशिंगटन सुंदरला अखेरच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. सुंदरनं अखेरच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सुंदरनं पदार्पणाच्या कसोटीसामन्यात ६२ आणि २२ धावांची खेळी केली. शिवाय ४ बळीही घेतले.

अफाट धन-दौलत मिळणार! मालव्य अन् बुधादित्य राजयोगाचा शक्तीशाली संयोग! या ३ राशींचे लोक जगतील ऐशो आरामात आयुष्य