-
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित पराभवाचं पाणी पाजणाऱ्या टीम इंडियातील सहा तरुण खेळाडूंच्या कामगिरीवर उद्योगपती आनंद महिंद्रा भलतेच खूश झाले आणि त्यांनी या तरुण खेळाडूंना एक शानदार गिफ्ट देण्याची घोषणा केली.
-
ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतात येताच आनंद महिंद्रा यांनी आपल्या कंपनीची ढासू ऑफ रोडर एसयूव्ही THAR टीम इंडियाच्या सहा तरुण खेळाडूंना गिफ्ट म्हणून देत असल्याचं जाहीर केलं.
-
मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि नवदिप सैनी या सहा खेळाडूंना महिंद्रांनी थार गिफ्ट केली.
-
टीम इंडियाच्या तरुण खेळाडूंना ही एसयूव्ही गिफ्ट करताना मला खूप आनंद होतोय असं महिंद्रा म्हणाले.
-
विशेष म्हणजे आनंद महिंद्रा स्वतःच्या पैशातून ही दमदार एसयूव्ही देणार आहेत. त्यासाठी कंपनीला कोणताही खर्च करावा लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय.
-
या तरुण खेळाडूंनी भारतातील भविष्यातील तरुण पिढ्यांसाठी स्वप्न पाहण्याची आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांचं मनोबल वाढावं म्हणून थार एसयूव्ही गिफ्ट केल्याचं महिंद्रांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
-
THAR ही महिंद्रा कंपनीची ऑफ रोडर एसयूव्ही असून भारतात लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये या गाडीची चांगलीच डिमांड आहे. या गाडीची भारतात किती मागणी आहे हे यावरुनच लक्षात येतं की, बूक केलेल्यांनाही गाडी घरी नेण्यासाठी अनेक महिने वाट बघावी लागतेय.
-
दरम्यान, भारताच्या उद्योग क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या आनंद महिंद्रांकडून इतकं ढासू गिफ्ट मिळाल्याने मराठमोळा शार्दुल ठाकूरही भलताच खूश झालाय.
-
शार्दुलने आनंद महिंद्रांच्या ट्विटला रिप्लाय देताना थार गिफ्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
-
"थँक्यू सर… तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणं हिच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे….तुमच्याकडून आलेलं गिफ्ट सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे….तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे अशक्य गोष्टी धुंडाळल्या पाहिजेत. तुम्ही दिलेल्या या गिफ्टसाठी मी आभारी आहे.", असं शार्दूलने म्हटलं आहे.

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा