-
करोनाच्या तडाख्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. (सर्व फोटो – एएनआय)
-
मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानावर खेळण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चेन्नईत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
-
श्रीलंका दौऱ्यासाठी न गेलेले इंग्लंडचे जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि रॉरी बर्न्स हे आधीच भारतात दाखल झाले. त्यांचा क्वारंटाइन कालावधीदेखील सुरू झाला. पण श्रीलंकेला गेलेला इंग्लंडचा संघ बुधवारी भारतात दाखल झाला.
-
चेन्नईच्या विमानतळावर सकाळी इंग्लंडचा संघ दाखल झाला. खेळाडू आणि सहाय्यक या साऱ्यांची विमानतळावरच करोना चाचणी करण्यात आली.
-
आज इंग्लंडचा संघ बायो-बबलमध्ये प्रवेश करेल. इंग्लंडचा संघ ६ दिवस क्वारंटाइन असणार आहे. त्यानंतर केवळ तीन दिवस सराव केल्यानंतर त्यांना भारताविरूद्ध मैदानात उतरावे लागणार आहे.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…