-
भारताच्या मालिका विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अजिंक्य रहाणेवर सध्या चहूबाजुंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो सौजन्य – अजिंक्य रहाणे इन्स्टाग्राम)
-
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने समर्थपणे कर्णधारपदाची जबाबदारी संभाळली व आपल्या नेतृत्वगुणांनी तमाम क्रिकेट चाहत्यांची मने जिंकून घेतली.
-
यशस्वी क्रिकेटपटू असण्याबरोबरच नम्रता हा त्याचा आणखी एक गुण. मायदेशात झालेल्या भव्य स्वागतानंतर एका कार्यक्रमात अजिंक्यने त्याची प्रचिती दिली.
-
त्याने कांगारुचे चित्र असलेला केक कापण्यास नकार दिला. अजिंक्य मुंबईत ज्या सोसायटीत राहतो, तिथल्या रहिवाशांनी त्याचे पुष्पगुच्छ आणि फुलांच्या माळांनी स्वागत केले. त्यावेळी तिथे कांगारुचे चित्र असलेल्या केकही होता.
-
अजिंक्यने रहिवाशांकडून आनंदाने पुष्पगुच्छ आणि फुलांच्या माळा स्वीकारल्या. पण त्याने कांगारुचे चित्र असलेला केक कापण्यास नकार दिला.
-
कांगारु हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्याप्रती आदर म्हणून रहाणेने केक कापण्यास नकार दिला.
-
हर्ष भोगले यांना दिलेल्या मुलाखीत अजिंक्यला कांगारुचे चित्र असलेल्या केक बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजिंक्यने जे उत्तर दिले, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजिंक्यचे उत्तर ऐकून प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे.
-
"कांगारु हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यामुळे मला तो केक कापायचा नव्हता. तुम्ही जिंकलात, इतिहास घडवलात, तरी समोरच्याचा आदर करा" असे अजिंक्यने सांगितले.
-
"अन्य देश आणि प्रतिस्पर्ध्यांबद्दल तुम्हाला आदर असला पाहिजे. त्यामुळे मी केक न कापण्याचा निर्णय घेतला" असे राहणेने हर्षा भोगले यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
-
तो एक फेज होता. तो आता संपलाय. मी आता कर्णधार नाहीय. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेवर मी लक्ष केंद्रीय केलय. जे काही घडले, तो इतिहास झाला. त्यामुळे आता पुढच्या मालिकेवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अजिंक्यने सांगितले.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…