-
‘आयटीएफ’ महिला टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ऋतुजा भोसले, झील देसाई, वैदेही चौधरी या भारतीय खेळाडूंचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. (फोटो: Facebook/RutujaSampatBhosale वरुन साभार)
-
पुण्यातील डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या ऋतुजाचा मारियाना झकारल्युक हिने पराभव केला. (फोटो :आशिष काळे)
-
२४ वर्षीय मारियाना झकारल्युक ही युक्रेनची टेनिसपटू आहे. (फोटो :आशिष काळे)
-
पाचव्या मानांकित मारियानाने दोन सेटमध्येच सामना जिंकला. (फोटो :आशिष काळे)
-
मारियानाने भारताच्या व चौथ्या मानांकित ऋतुजा भोसलेचा ७-५, ६-२ असा पराभव केला. (फोटो :आशिष काळे)
-
दोन सेटमध्ये मिळवलेल्या या विजयासहीत मारियानाने दिमाखात उपांत्य फेरी गाठली. (फोटो :आशिष काळे)
-
महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेच्या वतीने (एमएसएलटीए) वर्षभरापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या २०१९ च्या क्रमवारीनुसार महिलांमध्ये ऋतुजा भोसलेने अव्वल स्थान पकटाकवले होते. मात्र मारियानासमोर तिचा निभाव लागला आहे. (फोटो: Facebook/RutujaSampatBhosale वरुन साभार)
-
मारियाना झकारल्युक ही सर्वच बाबतीत ऋतुजा भोसलेपेक्षा सरस ठरली. (फोटो :आशिष काळे)
-
ऋतुजाची या स्पर्धेतील कामगिरी पाहता मारियानासमोर ती चांगलं आव्हान निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र हा सामना म्हणावा तितका संघर्षपूर्ण झाला नाही. (फोटो :आशिष काळे)
-
मारियानासमोर ऋतुजा फार काळ टीकू शकली नाही आणि तिचा या स्पर्धेतील प्रवास या पराभवासहीत संपला. (फोटो :आशिष काळे)

निरोप समारंभात गाणे गाणारे तहसीलदार थोरात निलंबित; संभाजीनगर विभागीय आयुक्तांची कारवाई