-
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
जसप्रीतने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
-
आज १५ मार्च रोजी जसप्रीतने स्टार अॅंकर आणि मॉडेल संजना गणेशनशी लग्न केले आहे.
-
त्यांचा विवाह सोहळा गोव्याला पार पडला असल्याचे म्हटले जात आहे.
-
काही मोजक्याच लोकांना लग्नसोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते.
-
जसप्रीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटो शेअर करत त्याने 'आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे आणि आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे' या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.
-
जसप्रीतने शेअर केलेल्या फोटोंमध्ये संजनाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
-
-
दोघेही या फोटोमध्ये अतिशय आनंदी दिसत आहेत.

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”