-
यंदाच्या आयपीएलमध्ये गतवर्षीचे विजेते असणाऱ्या मुंबई इंडियन्सला पुन्हा लय गवसल्याचं चित्र मागील दोन सामन्यांमध्ये दिसून आलं आहे. (सर्व फोटो ट्विटर आणि फेसबुकवरुन साभार)
-
सालाबादप्रमाणे यंदाही पहिल्याच सामन्यात पराभव झाल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत मुंबईचा संघांची कुठूनही विजयश्री खेचून आणण्याची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवली आहे.
-
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा भारतीय खेळाडू होण्याचा विक्रम रोहितने हैदराबादविरुद्धच्या सामन्यामध्ये स्वत:च्या नावावर केला. धोनीच्या २१६ षटकारांचा विक्रम मोडत रोहितने दोन षटकार लगावत २१८ षटकारांचा टप्पा गाठला. मात्र या षटकारांसोबतच या सामन्यात रोहितने घातलेल्या बुटांचीही चांगलीच चर्चा सोशल मिडियावर रंगल्याचं पहायला मिळालं.
-
खरं तर पहिल्या सामन्यापासूनच मुंबईचा कर्णधार वेगवेगळ्या थिमवर आधारीत शूज घालत असून त्यासंदर्भात त्याने सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे.
-
१० एप्रिल रोजी रोहित लिहिलेल्या पोस्टमध्ये सर्वात प्रथम त्याने या आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात खास बुट घालून मैदानात पाऊल ठेवलं. रोहितने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या खास बुटांसंदर्भातील माहिती स्वत:च्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दिली.
-
"काल मी जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरलो तेव्हा तो माझ्यासाठी केवळ एक सामना नव्हता. क्रिकेट खेळणं हे माझं स्वप्न होतं आणि हे जग अधिक चांगलं असावं यासाठी काम करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. त्यामुळेच माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असणाऱ्या एका खास कारणासाठी मी हे विशेष बुट घातले होते. मैदानात खेळणं मला खूप आवडतं आणि ते करतानाच मी या बुटांच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक पाऊल महत्वाचं आहे," असं रोहितने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
-
या फोटोमधील रोहितच्या बुटांकडे नीट पाहिल्यास त्यावर सेव्ह द रायनो म्हणजेच गेंड्यांचं संरक्षण करण्यासंदर्भातील संदेश देण्यात आल्याचं दिसून येतं. पोस्टच्या शेवटीही रोहितने गेंडा आणि हार्टचं इमोन्जी वापरुन खास बुट घालण्यामागील खास कारण म्हणजे गेंड्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे हे असल्याचं दर्शवलं. पहिला सामना मुंबईने गमावला होता. विराट कोहलच्या बंगळुरु संघाने २ विकेट्सचे या सामन्यात विजय मिळवला होता.
-
मुंबईचा दुसरा सामना झाला कोलकात्याविरोधात. या सामन्यामध्ये मुंबईने १० धावांनी निसटता विजय मिळवला.
-
१३ एप्रिल रोजी झालेल्या मुंबईच्या दुसऱ्या सामन्यामध्येही रोहितने एका विशेष कारणाला समर्पित थीमवर आधारीत बुट घातले होते. यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर लिहिताना तो हे बुट कोणत्या कारणासाठी घातले यासंदर्भात बोलला होता.
-
"मला फार प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी ही सुद्धा एक आहे आणि फार छान आहे. या गोष्टीवर आपण पूर्णपणे म्हणजेच १०० टक्के आपण नियंत्रण मिळवू शकतो. मला जे करायला आवडतं त्या क्रिकेट खेळण्यादरम्यान या कारणाला पाठिंबा देण्यासाठी मी अशापद्धतीने (बुट घालून) योगदान दिलं. मी या कामासाठी पाठिंबा दर्शवला असला तरी ही मोहीम संपलेली नाही. तुम्हीही माझ्यासोबत या मोहिमेमध्ये सहभागी होऊन सोबत चला. आपल्या समुद्रांचं आयुष्य पुन्हा सुदृढ करुयात," असं आवाहन रोहितने केलं होतं.
-
या बुटांवर वॉटर थीम दिसून येत होती तसेच बुटांवर सुमद्रातील कासवाचे चित्रही दिसून येतं होतं. पोस्टमध्ये रोहितने इमोन्जी वापरताना सर्व माश्यांचे इमोन्जी वापरले होते. सीईंग पॉसिबिलिटज म्हणजेच समुद्रातील पर्यावरण आणि प्राणी वाचवण्याची शक्यता वाढेल यासाठी काम करा, असं संदेश रोहितच्या या बुटांवर होता. प्लॅस्टिक मुक्त समुद्र असा संदेशही या बुटांवर होता.
-
नुकत्याच पार पडलेल्या १७ मार्चच्या सामन्यामध्येही मुंबईने सनरायझर्स हैदराबादच्या तोंडचा घास पळवावा अशापद्धतीने दमदार गोलंदाजीच्या जोरावर सामना १३ धावांनी जिंकला.
-
या सामन्यामध्ये रोहितच्या नेतृत्वाचं कौतुक तर झालंच शिवाय त्याच्या बुटांची चर्चा होणारा हा हॅटट्रीक सामना ठरला. कारण त्याने तिसऱ्या सामन्यातही खास कारणासाठी वेगळ्यापद्धतीचे बुट घातले होते.
-
समुद्रामध्ये नैसर्गिकरित्या असणारे खडक आणि प्रवळ हे समुद्राचा आत्मा आहे असं म्हणत रोहितने तिसऱ्या सामन्यातील बुटांचे महत्व सांगणारी पोस्ट लिहिली आहे. मला समुद्राविषयी किती प्रेम आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. पण समुद्राचे संवर्धन करणे आणि त्याला वाचवण्यासाठी झटणे हे माझ्यासाठी आयुष्यभराचं काम आहे. मला आधी समुद्राची भीती वाटायची. मात्र त्याबद्दल अधिक जाणून घेतल्यानंतर समुद्राच्या पोटात असणारं विश्व आणि आपल्यासाठी समुद्राचं असणारं महत्व माझ्या लक्षात आलं आणि मी समुद्राच्या प्रेमात पडलो. आपल्या वागणुकीमधील छोटासा बदल किंवा लहानशी कृती ज्यामुळे पर्यावरणाची फायदा होईल असं वाटतं ती एका अर्थाने फार प्रभावी असते. समुद्र वाचवणे म्हणजे आपलं भविष्य वाचवणे असं म्हणता येईल, असं रोहितने आपल्या पोस्टमध्ये लिहिलेलं.
-
रोहितने तिसऱ्या सामन्यात घातलेल्या बुटांवर वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि समुद्रातील वनस्पतींची चित्र होती. या संदर्भातील पोस्टमध्येही त्याने इमोन्जी वापरले होते.

२८ जुलैनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण; वाचा तुमच्या नशिबी काय…