पृथ्वी शॉ – भविष्यातील टीम इंडियाचा नियमित सलामी फलंदाज म्हणून पृथ्वी शॉकडे पाहिले जात आहे. मागील वर्षी बॉर्डर-गावसकर मालिकेत शॉ अपयशी ठरला. पण, आयपीएलच्या १४व्या सत्रात आणि त्याआधी झालेल्या विजय हजारे स्पर्धेत तो त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेचा विषय ठरला होता. शुबमन गिल – पृथ्वीचा जोडीदार सलामीवीर म्हमून शुबमन गिल सलामीला येऊ शकतो. आयपीएलचा १४वा हंगाम गिलसाठी चांगला गेला नाही, मात्र शेवटच्या बॉर्डर गावसकर मालिकेत त्याने शॉला रिप्लेस केले होते. ईशान किशन – छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळख असलेल्या ईशान किशनला आपीएलचा १४वा हंगाम फळला नाही. मात्र, तो स्फोटक फलंदाजी करण्यात तरबेज असल्याने त्याला कोणीही हलक्यात घेत नाही एवढे नक्की. आगामी काळातील टीम इंडियामध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. श्रेयस अय्यर – विराट कोहलीने निवृत्ती घेतली तर कर्णधारपद कोण सांभाळेल, या प्रश्नाचे उत्तर म्हणून मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरकडे पाहिले जात आहे. श्रेयस दुखापतीमुळे आयपीएल २०२१मध्ये खेळू शकला नाही. मात्र, त्याची गुणवत्ता, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहून तो भारताच्या कर्णधारपदाचा दावेदार असेल, एवढे नक्की. ऋषभ पंत – भविष्यकाळातील टीम इंडियाचा खंदा यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फिनीशर म्हणून ऋषभ पंतकडे पाहिले जात आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर पंतला अनेक संधी मिळाल्या. यातील काही संधी त्याने आजमावल्या तर काहीत तो अपयशी ठरला. पण त्यामुळे त्याच्या अनुभवात वाढ झाली. आयपीएल २०२१मध्ये तो जबाबदारीने खेळताना दिसून आला. संजू सॅमसन – क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण, फलंदाजी यात तरबेज असलेला क्रिकेटपटू म्हणजे संजू सॅमसन. सॅमसन हा अनेक वेळा टीम इंडियातून आत बाहेर होत राहिला. टी-२० आणि एकदिवसीय विभागात तो दमदार कामगिरी करत असून आगामी काळात तो टीम इंडियाचा कायमस्वरुपी संघात असलेला फलंदाज ठरू शकतो. हार्दिक पंड्या – अजून ९ वर्षांनी हार्दिक पंड्या टीम इंडियाचा अनुभवी ऑलराऊंडर म्हणून संघात कायम असेल. हार्दिक सध्या चांगल्या फॉर्मात नाही, शिवाय तो शस्त्रक्रियेमुळे जास्त गोलंदाजीही करू शकत नव्हता. पण सराव आणि योग्य कौशल्यांच्या आधारावर तो भविष्यकाळातील संघात कायम असू शकतो. रियान पराग – २०१९च्या आयपीएल हंगामातून रियान परागचे नाव सर्वत्र झळकत होते. राजस्थान रॉयल्सच्या फिनिशरची भूमिका त्याने बर्याच वेळेस निभावली आहे. आयपीएल २०१९मध्ये, लीगच्या इतिहासात अर्धशतक करणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला. वयाच्या १७व्या वर्षी त्याने अर्धशतक झळकावले. २०१७-१८च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये केवळ सात सामन्यात २४९ धावा करुन तो आसाम संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याचे वय आणि गुणवत्ता पाहता तो भविष्यकाळातील टीम इंडियात अष्टपैलू क्रिकेटपटूची भूमिका निभावू शकतो. राहुल चहर – मुंबई इंडियन्सचा प्रमुख फिरकीपटू म्हणून नाव कमावलेल्या राहुल चहरने आगामी काळातील टीम इंडियाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून आपली दावेदारी सिद्ध केली आहे. काटक शरीरयष्टीचा चहर फिरकीला पोषक ठरणाऱ्या खेळपट्टीवर प्रभावी ठरतो हे, आयपीएलमधील बहुतेक कर्णधारांनी ओळखले आहे. दीपक चहर – दीपक चहर हा राजस्थानचा एक युवा वेगवान गोलंदाज आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. पॉवरप्लेमधील आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे तो फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यात हुशार आहे. शिवाय, धोनीच्या हाताखाली खेळल्याने तो आगामी काळातील टीम इंडियात वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करू शकतो. आवेश खान – २०१६च्या १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान आवेश खान भारतीय संघाचा सदस्य होता. आयपीएल २०१७दरम्यान त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पदार्पण केले. आता तो दिल्ली कॅपिटल्सकडून आपली टीम इंडियासाठी दावेदारी सिद्ध करतो आहे. भविष्यातील टीम इंडियात तेजतर्रार गोलंदाज म्हणून आवेश खानचा संघात समावेश होऊ शकतो.

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…