टीम इंडियाचा नियमित कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणे आज आपला ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. अजिंक्य रहाणेला एकेकाळी राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हटले गेले होते. रहाणे हा एक कलात्मक शैलीचा फलंदाज असून तो भारतापेक्षा विदेशात अधिक यशस्वी ठरला आहे. दहा वर्षांपूर्वी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या मुंबईकर आणि मराठमोळ्या क्रिकेटपटूची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. २०११ मध्ये अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच काळात द्रविड आणि लक्ष्मणने निवृत्ती घेतली. २०१३मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या रहाणेने ७३ कसोटीत ४५८३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या खात्यात १२ शतकांचा समावेश आहे. भारतापेक्षा परदेशी खेळपट्ट्यांवर रहाणे यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे रहाणेने परदेशी भूमीवर १२ पैकी ८ शतके केली आहेत. रहाणेने आतापर्यंत पाच कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने चार कसोटी सामने जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. गेल्या वर्षी रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत २-१ असा पराभव केला होता. -
अजिंक्य रहाणे

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा