वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू क्रिकेटच्या मैदानात परतले. मैदानात परतताच टीम इंडियाच्या खेळाडूंनी साऊथम्प्टनमध्ये एक सामना खेळला. यात हे खेळाडू दोन संघ करून एकमेकांविरुद्ध खेळले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर या सामन्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या सराव सामन्यादरम्यान मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा दिसून आले. सराव सामन्याच्या आधारे भारतीय संघ इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संघालाही ड्यूक चेंडूने खेळण्याचा सराव करायचा आहे. तेथील परिस्थितीत फलंदाजाला ड्यूक चेंडूचा सामना करणे आव्हानात्मक आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना १८ जून ते २२ जून यादरम्यान साऊथम्प्टन येथे खेळला जाईल. या सामन्यासाठी २३ जून हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.

७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल