-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग हा नेहमीच आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानात गेल्यावर पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर तुटून पडणारा विरेंद्र सेहवागसारखा दुसरा फलंदाज भारतीय संघात झाला नाही. आपल्या या आक्रमक फलंदाजीसोबत सेहवाहने अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर केले आहेत. पण अनेकदा त्याला याचा तोटाही झाला आहे.
त्याच्या याच आक्रमक फलंदाजीमुळे एकदा भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिलेले जॉन राईट संतापले होते. त्यांचा हा संताप इतका होता की, त्यांनी सेहवागची कॉलरच पकडली होती. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने एका कार्यक्रमात बोलताना हा किस्सा सांगितला होता. जॉन राईट यांचा संताप पाहून भारतीय संघाला आश्चर्याचा धक्का बसला होता. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं होतं. (Photo: PTI) -
ही घटना २००२ मधील आहे. तेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट ट्रॉफीसाठी खेळत होता.
-
श्रीलंकेने फलंदाजी केल्यानंतर भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता. धावसंख्या जास्त नसल्याने भारतीय संघावर इतका दबाव नव्हता. (Photo: Reuters)
-
जॉन राईट यांनी सामन्याच्या सुरुवातीलाच कमी धावसंख्या असल्याने धीम्या गतीने खेळा आणि विजय मिळवा असं सांगितलं होतं.
-
गांगुली लवकर बाद झाल्यानंतर तंबूत परतला तेव्हा मैदानात सेहवाग जोरदार फटकेबाजी करत होता. यावेळी जॉन राईट गांगुलीच्या बाजूलाच बसलेले होते. (Photo: Reuters)
-
त्यांच्याइतका चिंता करणारा व्यक्ती मी कधी पाहिलेला नाही असं गांगुली म्हणतो. याचं उदाहरण देताना गांगुलीने सांगितलं होतं की, जेव्हा भारतीय संघ फलंदजी करतो तेव्हा फ्रिजर धोक्यात असतो, कारण जॉन राईट पाण्याची बाटली घेतल्यानंतर दरवाजा जोरात आदळत असत. (Photo: AP)
-
दरम्यान मैदानावर फलंदाजी करणाऱ्या सेहवागने एक खराब फटका मारला आणि बाद झाला. विरु तंबूत परतला तेव्हा गांगुलीने सेहवाग तसंच जॉन राईट यांच्याकडे पाहिलं नाही. जॉन राईट तेव्हा काय विचार करत असावेत याची गांगुलीला कल्पना होती. (Photo: Reuters)
-
यानंतर काही वेळाने गांगुलीने पाहिलं तेव्हा जॉन राईट त्याच्या शेजारी नव्हते. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये काय सुरु आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. भारतीय संघाने हा सामना सहा गडी राखून सामना जिंकला. (Photo: AP)
-
सामना संपल्यानंतर गांगुली संघाचं अभिनंदन करण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये गेला तर तिथे भयाण शांतता होती. त्यानंतर गांगुलीने अनिल कुंबळेला नेमकं काय झालं असं विचारलं. आपण जिंकलो नसून पराभव झाला आहे असं वातावरण असल्याने गांगुलीला प्रश्न पडला होता. (Photo: PTI)
-
त्यानंतर कुंबळेने गांगुलीला ड्रेसिंग रुमच्या बाहेर नेलं आणि जॉन राईटने सेहवागवर हात उचलला असल्याचं सांगितलं. गांगुलीला आश्चर्य वाटलं आणि त्याने आत जाऊन पाहिलं तर सेहवाग एका कोपऱ्यात बसून बॅट नीट आहे का पाहत होता. गांगुलीला त्याच्या तोंडातून रक्त येत असावं असं वाटत होतं. पण तो नीट असल्याचं पाहून गांगुलीने अनिल कुंबळेला खरंच मारलं की मस्करी करत आहेस विचारलं. (Photo: Reuters)
-
यावर कुंबळेने सांगितलं की, "विरेंद्र सेहवाग ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर जॉन राईटने त्याची कॉलर पकडली आणि भिंतीशी धरुन कोपऱ्यात नेलं आणि तू परत कधी भारतासाठी खेळू शकत नाहीस सांगितलं. कारण तो फटका आपला पराभव करु शकत होता".
-
हे सर्व सुरु होतं तेव्हा गांगुली ड्रेसिंग रुमच्या बाहेर होता. या घटनेवर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे गांगुलीला समजत नव्हतं.
-
यानंतर भारतीय संघ तेथून निघाला आणि बसमध्ये पोहोचला. यावेळी गांगुली पहिल्या, जॉन राईट तिसऱ्या आणि सेहवाग मागच्या सीटवर बसलेले होते.
-
यानंतर गांगुलीने जॉन राईटला नेमकं काय झालं आहे अशी विचारणा केली. यावर जॉन राईटने सर्व काही ठीक आहे चिंता करु नको असं म्हटलं. यावर गांगुलीने तुम्ही खरंच सेहवागला ठोसा मारला का असं विचारलं असता त्यांनी होकार दिला. यावर गांगुलीने त्यांना मग सेहवागने त्यावरुन तुमच्यावर हात उचलला का ? असं विचारलं असता जॉन राईट यांनी नाही म्हणत त्याची हिंमत असं विचारलं. यावर गांगुलीने आश्चर्य व्यक्त केलं, पण त्याने जास्त काही विचारलं नाही.
-
यानंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये पोहोचला. संघ बसमधून उतरत असताना गांगुली मात्र थांबला होता. विरेंद्र सेहवाग यावेळी सर्वात शेवटी होता. गांगुलीने त्याला थांबवलं आणि आपल्या बाजूला बसायला सांगितलं आणि जॉन राईटने तुला ठोसा मारला का? असं विचारलं. यावर सेहवागने कोणी सांगितलं असं विचारलं असता गांगुलीने मी संघाचा कर्णधार असून मला माहिती असणं अपेक्षित आहे असं म्हटलं.
-
यावर सेहवागने चिंता करु नको, हे सगळं होत असतं…मी वाईट फटका खेळलो. त्यांनी रागाच्या भरात हात उचलला…पण काही हरकत नाही असं म्हटलं. यानंतर सेहवान बसमधून उतरला आणि निघून गेला.
-
पण यानंतरही गांगुली दहा मिनिटं बसमध्ये बसून होता. यावेळी गांगुलीला आपण आनंदी व्हावं की दुखी हे कळत नव्हतं.
-
गांगुलीला आपण एक चांगली टीम म्हणून तयार होत असल्याचं वाटलं. त्याने हॉटेलमध्ये जाऊन सचिन तेंडुलकरलाही आपण एक चांगली टीम म्हणून समोर येत असल्याचं म्हटलं. यावर सचिनने असं का विचारलं असता गांगुलीने जॉन राईट आणि सेहवागमधील प्रकार सांगितलं. सचिननेही आपण ते सर्व पाहिलं असल्याचं म्हटलं. (Photo: PTI)
-
भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये घडलेला हा प्रकार त्यावेळी कोणीही बाहेर येऊ दिला नाही. मीडियादेखील याची खबर नव्हती. संपूर्ण संघ एकत्र आहे याची जाणीव झाल्याने गांगुलीलाही त्या गोष्टीचा अभिमान वाटला होता. कारण यानंतर काही दिवसांनी सेहवगाने शतक ठोकलं आणि जॉन राईटने त्याचं तोंडभरुन कौतुक करत सर्वात्तम आघाडीचा फलंदाज असल्याचं म्हटलं होतं.
-
(Photos: PTI, AP, Reuters, Express)

“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?