भारतीय संघ आज सोमवारी श्रीलंकेला रवाना झाला. टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी या प्रवासातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिखर धवन २० सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. -
धवनच्या या फोटोत कुलदीप यादव, युजवेंद्र चालह आणि पृथ्वी शॉ हे विजयाचे संकेत देताना दिसत आहेत तर भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादवही दिसत आहेत.
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे गेल्या काही काळापासून संघर्ष करत आहेत आणि श्रीलंकेत त्यांना पुन्हा फॉर्म मिळवण्याची आशा आहे. आयएलमध्ये दमदार कामगिरी केलेला दीपक चहरली लंकेला रवाना झाला आहे. १३ जुलैला टीम इंडिया खेळणार लंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळणार आहे. दीपकचा भाऊ राहुल चहरही त्याच्यासोबत आहे. आगामी वर्ल्डकपचा विचार करता राहुलची स्पर्धा चहल आणि यादवशी असणार आहे. -
तर, यष्टीरक्षक म्हणून या दौऱ्यावर संजू सॅमसन भारतीय संघाचा भाग आहे.

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”