दक्षिण आफ्रिका संघाचे माजी व्यवस्थापक गुलाम राजा यांचे करोना व्हायरससंबधी असलेल्या आजारपणामुळे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. राजा यांनी जवळपास दोन दशके संघासह दौरा केला. १९९२ ते २०११ या काळात ते राष्ट्रीय संघात होते. जवळजवळ दोन महिने ते या व्हायरसशी झुंज देत होते. -
आफ्रिकेच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स यानेही राजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ''गुलाम राजा यांच्या निधनाच्या बातमीने मला दु: ख झाले आहे. माझ्या आयुष्यात ते माझ्यासाठी काय होते, याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुमची आम्हाला आठवण येईल'', असे डिव्हिलियर्सने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलाकने त्यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. तो म्हणाला, '‘राजा यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. ते एक मित्र आणि संघाचे दिग्गज संघ व्यवस्थापक होते. ते माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्वाचा भाग होते.'' -
देशासाठी मोठे योगदान दिल्यानंतर राजा २०११मध्ये निवृत्त झाले. त्यांनी अनेक क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये वेळ घालवला आहे, १९९९च्या वर्ल्डकपमधील उपांत्य सामन्यामध्ये झालेला संघाचा पराभव हा त्यांनी पाहिला आहे.

Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया