-
रवी शास्त्री
-
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्याकडे प्रशिक्षणाचा खूप अनुभव आहे. सध्या ते आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादचे क्रिकेट संचालक आहे. २००५ पासून ते विविध संघांना प्रशिक्षण देत आहेत. श्रीलंका नॅशनल टीम व्यतिरिक्त ते आयपीएल, कॅरिबियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील कोचिंगशी संबंधित आहे.
टीम इंडिया सध्या राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंका दौर्यावर आहे. अशा परिस्थितीत, सर्वांची नजर त्याच्यावर असेल. अनेक खेळाडू तयार करण्याचे श्रेय त्याला जाते. २०१५ मध्ये राहुल द्रविडने भारताच्या १९ वर्षांखालील संघ आणि टीम अ च्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्याच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, मयंक अग्रवाल, ईशान किशन या खेळाडूंनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. वीरेंद्र सेहवागने यापूर्वीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला होता. सेहवाग त्याच्या स्पष्ट वक्तव्यामुळे ओळखला जातो. त्याला कोचिंगचा अनुभव नाही. ही त्यांच्यासाठी नकारात्मक गोष्ट आहे. पण त्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत त्याला संधी मिळू शकते. न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन सध्या आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संचालक आहेत. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आहे. त्यामुळे दोघांमध्ये चांगले नाते आहे. न्यूझीलंडने हेसन यांच्या प्रशिक्षणाखाली चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी ते एक आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”