वेस्ट इंडिजच्या महिला संघाची कर्णधार स्टेफनी टेलरने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्या टी-२० मध्ये तिने हॅट्ट्रिकसह ४ बळी घेतले. टी-२० मध्ये हॅट्ट्रिक घेणारी ती विंडीजची दुसरी गोलंदाज आहे. यापूर्वी अनिशा मोहम्मदने २०१८मध्ये हा पराक्रम केला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ सामन्यात केवळ १०२ धावा करू शकला. स्टेफनी टेलरने ३.४ षटकांत १७ धावा देऊन ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल विंडीजने १९.१ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. टेलरने नाबाद ४३ धावा केल्या. संघाने मालिका ३-० ने जिंकली. मे २०१९ नंतर विंडीजने टी-२० मालिका जिंकली आहे. स्टेफनी टेलरची ही टी-२० मधील कामगिरी उत्कृष्ट आहे. तिच्या नेतृत्वातच विंडीज संघाने २०१६मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या सामन्यात स्टेफनी टेलरने नाबाद ५९ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ दोन महिला खेळाडूंनी ३ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात स्टेफनी टेलरचा देखील समावेश आहे. न्यूझीलंडचा सुझी बेट्स ३३०१ धावांनी अव्वल आहे. स्टेफनी टेलरने ३१२१ धावा केल्या असून २१ अर्धशतके केली आहेत. एवढेच नव्हे तर तिने १११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९८ बळीही घेतले आहेत. -
महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच जणांच्या यादीत ३० वर्षीय स्टेफनी टेलरचा समावेश आहे. तिने १२६ सामन्यात ४७५४ धावा केल्या आहेत. तिने ५ शतके आणि ३६ अर्धशतके केली आहेत. याशिवाय तिने वनडेमध्ये १४२ बळीही घेतले आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा