-
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी आज ४० वर्षांचा झाला. धोनी आपल्या खेळावर आणि क्रिकेटवर जेवढं प्रेम करतो तितकच तो आणखीन एका गोष्टीवर प्रेम करतो आणि ती गोष्ट म्हणजे बाईक्स. धोनीला बाईक्सचे प्रचंड वेड आहे. याचसंदर्भात आणि धोनीच्या बाईक कलेक्शनमधील महागड्या सुपरबाईक्सबद्दल आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
धोनी विरंगुळा म्हणून त्याची सर्वात पहिली बाईक म्हणजेच यमाहा राजदूतची डागडुजी करत असतो असं धोनीच्या जीवनावर आधारित एम.एस. धोनी चित्रपटामध्येही गॅरेज दुष्य दाखण्यात आलं आहे. यामधूनही त्याचे बाईकबद्दलचं प्रेम मोठ्या पडद्यावर दिसलं आहे.
-
धोनीच्या बाईक प्रेमाबद्दल तुम्हाला यावरुन समजलं नसेल तर हा वरचा फोटो दिसतोय ना तो धोनीच्या पत्नीने म्हणजेच साक्षीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा फोटो आहे धोनीच्या बाईक कलेक्शन असणाऱ्या गॅरेजचा. (फोटो: Instgram/sakshisingh_r)
-
होय, खरोखरच धोनीचं दोन मजल्याचं बाईक कलेक्शनचं गॅरेज आहे. यामध्ये शेकडो बाईक्स असून सर्वच बाईक व्यवस्थित सुरु आहेत. (फोटो: Instgram/sakshisingh_r)
-
अर्थात आता एवढं मोठं कलेक्शन असणाऱ्या धोनीकडे काही खास बाईक्स आहेत. भारतामध्ये असणाऱ्या दुर्मिळ बाईक्सपैकी काही खास बाईक्स धोनीच्या कलेक्शनमध्ये आहे. धोनीच्या याच कलेक्शनमधील सात खास बाईक्स पाहुयात…
कवासाकी निंजा झेडएक्स १४ आर – २० लाख (Kawasaki Ninja ZX14R – Rs 20 Lakhs) : धोनीला जपानमध्ये तयार करण्यात आलेल्या बाईक्सचं प्रचंड आकर्षण आहे. या बाईक्स या जगातील सर्वात लोकप्रिय बाईक्सपैकी आहेत. २००६ साली लॉन्च झालेली कवासाकी निंजा झेडएक्स १४ आर ही सर्वात शक्तीशाली बाईक्सपैकी एक आहे. धोनीने ही बाईक विकत घेतली होती तेव्हा ती भारतातल्या सर्वात वेगवान बाईक्सपैकी एक होती. (फोटो: Kawasaki) -
कवासाकी निंजा झेडएक्स १४ आर १९२ बीपीएच क्षमतेची आहे. भारतामधील शक्तीशाली एसयुव्ही इतक्याच क्षमतेच्या असतात. या गाडीचे वजन ३०० किलोहून कमी आहे. या बाईकचा सर्वाधिक वेग २९९ किमी प्रती तास इतका आहे. १९९० च्या कालावधीमध्ये जपानमधील बाईक निर्मिती कंपन्यांनी सर्वाधिक वेगवान बाईक्स बनवण्याची स्पर्धा थांबवण्यासाठी २९९ किमीचा सर्वोच्च वेग निश्चित केल्याने बाईकची क्षमता इतकी असूनही वेग ३०० किमीच्या आत आहे.
-
धोनीकडे असणारी कवासाकी निंजा एच टू ही स्ट्रीट लिगल व्हर्जन बाईक आहे. या बाईकची क्षमता २२७ बीपीएच इतकी आहे. अवघ्या तीन सेकंदांमध्ये ही गाडी ० ते १०० किमी वेग पकडू शकते. या बाईकचा सर्वाधिक वेग ३२० किमी प्रती तास इतका आहे. या गाडीचा ट्रॅक व्हर्जन म्हणजेच रेसिंगसाठी वापरली जाणारी गाडी ४०० किमी प्रती तास वेगाने धावू शकते.
-
कॉनफेडीरेट एक्स १३२ हेलकॅट ३० लाख रुपये + आयात कर आणि इतर कर : (Confederate X132 Hellcat – Rs 30 Lakhs + Import Duties & Taxes) कॉनफेडीरेट भारतामध्ये बाईक्स विकत नाहीत. त्यामुळेच धोनीने ही गाडी परदेशातून आयात केली. बॉबर मोटरसायकल प्रकारातील ही सर्वात शक्तीशाली बाईक आहे. तसेच ही जगातील सर्वात शक्तीशाली सिंगल सीटर बाईक आहे. (फोटो: धोनीच्या ट्विटर अकाउंटवरुन)
-
कॉनफेडीरेट एक्स १३२ हेलकॅट ही बाईक ऑर्डर दिल्यानंतर यंत्रांचा कमीत कमी वापर करुन थेट हाताने असेंबल केली जाते. ही नेकेड बॉडी प्रकारची बाईक असल्याने ती अधिक खास आहे. या बाईकची क्षमता १२० बीएचपी इतकी आहे. या बाईकचा सर्वाधिक वेग २५० किमी प्रती तास इतका आहे.
-
हार्ली डेव्हिडसन फॅट बॉय- १९ लाख (Harley-Davidson Fat Boy – Rs 19 Lakhs) : बाईकप्रेमी आणि जगभरातील वाहन क्षेत्राशी संबंधित सर्वांनाच ठाऊक असणारे नाव म्हणजे हार्ली डेव्हिडसन. प्रत्येक बाईकप्रेमीला एकदातरी आपल्याकडे ही बाईक असावी असं वाटतं. असं असतानाच बाईकचे कलेक्शन करणाऱ्या धोनीच्या कलेक्शनमधून ही सुटली तर नवलचं. धोनीकडे या बाईकचे टॉपचे मॉडेल आहे.
-
हार्ली डेव्हिडसन या क्लासिक बाईक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांचा लूक आणि रुबाब हे अधिक महत्वाचे असते. धोनीकडे असणारी फॅट बॉयही अशाच प्रकारची बाईक आहे. या बाईकचा सर्वाधिक वेग हा ताशी १७५ किमी इतका आहे. (फोटो: Wikipedia/Nitot)
-
डुकाटी १०९८ एस – ३० लाख रुपये आयात कर अधिक इतर कर (Ducati 1098 S – Rs 30 Lakhs + Import Duties & Taxes) : धोनीकडे असणाऱ्या मोजक्या इटालियन बनावटींच्या बाईक्सपैकी ही एक आहे. डुकाटी १०९८ ही २००७ साली लॉन्च झाली होती. त्यावेळी धोनीने या बाईकचे एस व्हर्जन विकत घेतलं. (फोटो: Ducati)
-
डुकाटी १०९८ एसचा सर्वाधिक वेग २८० किमी प्रती तास आहे. या बाईकच्या इंजिनची क्षमता १७० बीएचपी इतकी आहे. या बाईकचे सर्व स्पेसिफिकेशन पाहिल्यावर ही खऱ्या अर्थाने सुपरबाईक आहे असं म्हणता येईल. (फोटो: Wikipedia/Aaron Lai)
-
यमाहा थंडरकॅट किंवा व्हायझेडएफ६००आर (किंमत उपलब्ध नाही) (Yamaha Thundercat YZF600R) : कवासाकी आणि यमाहामध्ये स्पर्धा सुरु करणारी ही बाईक ठरली असं म्हणता येईल. १९९६ साली ही बाईक जेव्हा लॉन्च झाली होती त्यावेळी जगातील सर्वात वेगवान बाईक होती.
-
यमाहा थंडरकॅट ही सर्वात सोयीस्कर सुपरबाईकपैकी एक आहे. ही बाईक आरामात २०० किमी प्रती तास वेग गाठू शकते. अवघ्या पाच सेकंदांमध्ये ही बाईक ० ते १०० किमीचा वेग गाठू शकते.
-
याशिवाय धोनीकडे रॉयल इनफिल्ड मिचिस्मो, सुझूकी शगून, यमाहा आरडी३५०, यमाहा व्हायझेएफ ६०० आर, बीएसए गोल्डस्टार, हार्डली डेव्हिडसन आर्यन ८८३ सारख्या क्लासिक बाईक्सही आहेत. (फोटो: Instgram/sakshisingh_r)

Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका