-
टीम इंडिया
डावखुरा सलामीवीर देवदत्त पडिकक्कलने विजय हजारे ट्रॉफीच्या सर्व ७ सामन्यांमध्ये प्रत्येकी ५० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीसाठीही उत्तम कामगिरी केली आहे. सीएसकेकडून खेळणारा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडनेही अप्रतिम कामगिरी केली आहे. गेल्या आयपीएल मोसमातील शेवटच्या तीन सामन्यात त्याने अर्धशतके ठोकली होती. कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी मुख्य फलंदाज असलेल्या नितीश राणाचीही या मालिकेसाठी निवड झाली आहे. दुसरीकडे लेगस्पिनर वरुण चक्रवर्तीने आयपीएलमध्ये केकेआरसाठी चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड मालिकेदरम्यान खराब फिटनेसमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकला नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने सध्याच्या आयपीएल हंगामात मोठ्या फलंदाजांना त्रास दिला आहे. या कामगिरीमुळे त्याला मालिकेसाठी संधी मिळाली. -
याशिवाय फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू कृष्णप्पा गौतमसुद्धा चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…