टोक्यो ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या महिला एकेरीत झालेल्या स्पर्धेत भारताच्या आशा मावळल्या आहेत. ही मालिका भारताची स्टार टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राच्या पराभवाने संपली. (फोटो सौजन्य : Reuters) -
मनिका बत्रा
-
मनिकाच्या आधी आज पहिला ऑलिम्पिक खेळणारी सुतीर्थ मुखर्जीही दुसर्या फेरीत पराभूत झाल्यानंतर बाहेर गेली आहे.
-
मनिका बत्राने ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कोनोवाविरुद्ध अपेक्षेनुसार खेळ केला नाही. संपूर्ण सामन्यात तिची लय हरवल्यासारखी वाटली. परिणामी तिला एक गेमही जिंकता आला नाही. पहिल्या चार सामन्यात सोफियाने या सर्वांना चितपट केले आणि तिसर्या फेरीचा सामना सहज ४-० ने जिंकला.
-
सोफिया पोल्कोनोव्हाने मनिका बत्राविरुद्ध ८-११,२-११, ५-११, ७-११ असा सामना जिंकला. मनिकाने सोफियाला फक्त पहिल्या फेरीतच थोडीफार टक्कर दिली. सुतिर्था मुखर्जीचा पराभवानंतर भारताला मनिकाकडून मोठ्या आशा होत्या. पण, मनिका त्या अपेक्षेप्रमाणे खेळू शकली नाही. त्यामुळे टेबल टेनिस महिला एकेरीत भारताचा पदकांचा प्रवास संपुष्टात आला आला आहे.
-
महिला पराभवानंतर भारताचा आशा आता पुरुष एकेरीवर आधारीत आहेत. शरथ कमलने तिसर्या फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या दिवशी झालेल्या दुसर्या फेरीच्या सामन्यात त्याने पोर्तुगालच्या खेळाडूचा पराभव केला. शरथ कमलने ६ सामन्यात ४-२ च्या फरकाने सामना जिंकला.
-
मात्र आजच्या सामन्यात मनिकाचा पराभव झाला असला तरी तिने या पूर्वीचा सामना मोठ्या शिताफीने जिंकला होता. सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवागसारखे दिग्गजही तिच्या जुंजार वृत्तीवर फिदा झाल्याचं पहायला मिळालं.
-
मनिकाने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत जागतिक क्रमवारीत ३२ व्या क्रमांकाच्या मार्गारायटा पेसोत्स्काला नमवून महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली होती.
-
जागतिक क्रमवारीत ६२व्या क्रमांकावर असलेल्या मनिकाने पहिले दोन गेम गमावल्यानंतर आश्चर्यकारक पुनरागमन करीत सामना ४-११, ४-११, ११-७, १२-१०, ८-११, ११-५, ११-७ अशा फरकाने ५७ मिनिटांमध्ये जिंकला होता.
-
कारकीर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या मनिकाकडून आणखी एका धक्कादायक कामगिरीची अपेक्षा करण्यात येत होती.
-
मात्र या सामन्यात तिला कमाल दाखवता आली नाही. असं असलं तरी मनिका खूपच तरुण असल्याने तिला भविष्यात अनेक संधी मिळणार आहेत. अनेकांनी मनिकाने छान कडवी झुंज दिल्याबद्दल रविवारी तिचं कौतुक केलं होतं. याच मनिकाबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
-
मनिका वयाच्या चौथ्या वर्षापासून टेबल टेनिस खेळतेय. तिला या खेळाची एवढी आवड आहे की तिने या खेळासाठी वयाच्या १६ व्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडून देत संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रित केलं.
-
याच वर्षी मनिकाला तिच्या देखण्या लूक्समुळे मॉडलिंगच्या काही ऑफर्सही आलेल्या मात्र खेळाच्या प्रेमापोटी तिने या ऑफर्स नाकारल्या.
-
२०११ मध्ये मनिकाने चिली ओपनमध्ये २१ वर्षांखालील विभागामध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये टेबल टेनिस चॅम्पीयनशीपमध्ये तिने तीन पदकं जिंकली होती.
-
२०१६ च्या आशियाई खेळांमध्ये तिने ३ सुवर्ण आणि एक रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर तिला जगातील काही मोजक्या हुन्नरी तरुण टेबल टेनिस खेळाडूंपैकी एक म्हणून ओळख मिळाली.
-
२०१८ मध्ये तिने आशियाई खेळांमध्ये कांस्य पदक मिळवलं. मात्र त्याच वर्षी तिने कॉमनवेल्थ खेळांमध्ये दोन सुवर्ण, एक कांस्य आणि एक रौप्य पदक मिळवलं.
-
मात्र ऑलिम्पिकच्या पदकासाठी आता तिला आणखीन चार वर्षे वाट पहावी लागणार आहे.
-
मनिका तिच्या खेळाबरोबर फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
-
अनेकदा तिच्या नखांवर ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होते तेव्हा तिरंग्याच्या रंगात नेलपॉलीश लावलेली पहायला मिळते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मनिका बत्रा / ट्विटर)

“पण घाई काय आहे?”, सरन्यायाधीश गवई यांची टिप्पणी; मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींच्या सुटकेला महाराष्ट्र सरकारचे आव्हान