-
टी -20 क्रिकेट फॉर्मेट आजकाल प्रक्षेकांना आवडत आहे. हा फॉर्मेट २००५ मध्ये सुरू झाला. हळूहळू या फॉर्मटची लोकप्रियता वाढतच गेली. आजच्या काळात या खेळाची वेगळीचं क्रेझ आहे. अशा गेममध्ये खेळाडू कमी बॉलमध्ये अधिक धावा करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी – २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे. सर्वाधिक षटकार ठोकणार्या क्रिकेटपटूंवर नजर टाकूया…
-
मार्टिन गुप्टिल- न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल आंतरराष्ट्रीय टी – २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात गुप्टिलने आतापर्यंत ९८ डावांमध्ये १४७ षटकार ठोकले आहेत. (Image: Martin Guptil Instagram)
रोहित शर्मा- भारतीय संघाचा सलामीवीर आणि हिटमन म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत 103 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने खेळले आहेत आणि 133 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. (Image: Indian Express Archieve) ख्रिस गेल- वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल या यादीत तिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला टी -२० क्रिकेटचा महान फलंदाज मानल्या जाते. ६६ डावांमध्ये फलंदाजी करताना गेलने ११९ षटकार ठोकले आहेत. (Image: Indian Express Archieve) -
इयोन मॉर्गन – आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणार्या क्रिकेटपटूंच्या यादीत इयोन मॉर्गनचा देखील समावेश आहे. त्याने ९९ डावांमध्ये फलंदाजी करताना ११४ षटकार ठोकले आहेत. (Image: Indian Express Archieve)
-
अॅरॉन फिंच – आक्रमक फलंदाजांच्या यादीत अॅरॉन फिंचचा देखील समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार्या क्रिकेटपटूंच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. फिंचने त्याच्या ७६ डावांमध्ये १०७ षटकार ठोकले आहेत. (Image: Aaron Finch Instagram)

३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”