-
२०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जेव्हा शरणार्थी स्पर्धकांनी भाग घेतला होता तेव्हा जगभरातील शरणार्थींमध्ये आपण आता पुढे येऊन येऊन धैर्याने आपला खेळ दाखवू शकतो अशी आशा निर्माण झाली होती. (सर्व फोटो yusramardini इन्स्टाग्राम)
-
युसरा मर्दिनीची गोष्टही अशीच काही आहे. सिरिया ते रिओ आणि नंतर टोक्यो ऑलिम्पिकपर्यंतचा अॅ्थलीट होण्याचा तिचा संघर्ष सर्वांना विचार करण्यास नक्कीच भाग पाडू शकतो
-
युसरासाठी इथं पर्यंतचा प्रवास कधीही सोपा नव्हता, कधीच होणार नाही, परंतु खेळप्रती प्रेम असलेल्या अनेकांनी तिला यातून मार्ग दाखवला आणि हे सर्व शक्य झालं आहे.
-
पाच वर्षांपूर्वी झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने पहिल्यांदा भाग घेतला होता. यावेळी ती किशोरवयीन होती आणि तिच्या गोष्टीने लोकांना आश्चर्यचकित केलं होतं.
-
@Goodable ने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. सीरियन गृहयुद्ध चालू होते त्यावेळी ती किशोरवयीन होती. ती ३ तास समुद्रात पोहत होती, मोकळ्या समुद्रात, ती बुडत्या बोटीतून लोकांना वाचवत होती. मग ती ग्रीसहून जर्मनीला पायी गेली. आज तिने ऑलिम्पिकसाठी १०० मीटर बटलफ्लाय स्पर्धा पूर्ण केली आहे.
-
युसराचा जन्म एका सिरियन मुस्लिम कुटुंबात झाला होता. तिचे वडील स्विमिंग कोच होते, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी ते तिला पोहायला शिकवायचे. पण तिला वैमानिक व्हायचे होते. तिला विमान उडवण्याची आवड होती.
-
२०१५ मध्ये युसराने सिरियातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. ग्रीसला जाण्यापूर्वी ती बोटीने तुर्कीला पळून गेली होती. वाटेत त्यांची बोट बुडाली. सर्व त्रासानंतर युसरा आणि तिची बहीण शेवटी बर्लिनला पोहचली, जिथे त्यांनी निर्वासिताच्या रूपात आपले जीवन पुन्हा सुरू केले. त्यानंतर युसराने पुन्हा जर्मनीमध्ये या पोहण्याचे प्रशिक्षण सुरू केले.
-
त्यावेळी युसरा मर्दिनी १० खेळाडूंपैकी एक होती जे रिओ २०१६ मध्ये पहिल्यांदा शरणार्थी ऑलिम्पिक संघाचा भाग बनली होती. आपल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, 'खेळामुळेच माझे आयुष्य बदलले आहे, यामुळे आपण आपले जीवन अधिक चांगले करू शकू अशी आशा निर्माण झाली आहे.”
-
ती म्हणते, 'मला खूप काही करायचे आहे, पण पोहण्याचा क्रमांक सर्वात आधी आहे. त्यामध्ये ऑलिम्पिक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे. माझी अशी इच्छा आहे की जगात शांतता असावी, लढाई होऊ नये, निर्वासित नसावे. आपण सर्वजण प्रेमात आणि सौहार्दाने एकत्र राहू या. मला माहित आहे की हे खूप कठीण आहे परंतु हे माझे स्वप्न आहे.”

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा