-
भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झाने टोक्यो ऑलिम्पिकच्या घोडेस्वारी स्पर्धेत अंतीम फेरीत स्थान मिळवलं आहे.
-
फवादच्या या कमागिरीच्या जोरावर भारताच्या पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
-
फवादने सर्वोत्तम कामगिरी केली तर तो घोडेस्वारीमध्ये भारताला पदक मिळवून देणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरेल.
-
मात्र थेट ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारीच्या स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणारा आणि भारताला थेट सुवर्णपदकाची संधी मिळवून देणारा फवाद आहे तरी कोण जाणून घेऊयात…
-
बंगळुरूमध्ये जन्मलेला आणि तिथेच लहानाचा मोठा झालेला फवाद २९ वर्षांचा आहे.
-
ऑलिम्पिकपूर्वी तो उत्तर-पश्चिम जर्मनीतील खेड्यामध्ये घोडेस्वारीचा सराव करत होता.
-
फवाद दिवसातून सुमारे बारा तास घोड्यांसमवेत प्रशिक्षण घेत असतो.
-
फवाद आणि त्याची घोडी दाजरा अतिंम फेरीत पोहचल्याने आता सर्वच भारतीयाचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे.
-
फवादचे वडील डॉ. हसनीयन मिर्झा हे सुद्धा घोडेस्वारच होते.
-
लहानपणापासूनच फवादला घोड्यांबद्दल प्रेम होतं. त्यामुळेच तो वडिलांच्या प्रशिक्षणाखालीच घोडेस्वारी करु लागला.
-
पाच वर्षांचा असल्यापासून फवाद घोडेस्वारी करतोय.
-
दोन दशकांनंतर फवादच्या रुपाने प्रथमच एखादा घोडेस्वार ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
-
फवादच्या आधी विंग कमांडर आय. जे. लांबा आणि इम्तियाज अनीस या घोडेस्वारांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
-
विंग कमांडर आय. जे. लांबा यांनी १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केले होते तर इम्तियाज अनीस यांना २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळालेली.
-
फवादने यापूर्वी २०१४ साली जकार्ता आशियाई खेळांमध्ये आपली चमक दाखवली होती.
-
त्यानंतर २०१८ साली फवादने आशियाई खेळांमध्ये जपिंग प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावलं होतं.
-
फवादने २०१५ साली पोलंडमध्ये स्ट्रेजिगोममधील सीसीआयथ्री-एसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं.
-
२०२० मध्ये आग्नेय आशियातील देशांमधून फवाद पहिला आला होता.
-
दाजरा-४ असे फवादला ऑलिम्पिकमध्ये साथ देणाऱ्या घोडीचे नाव आहे.
-
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडू आणि अधिकाऱ्यांप्रमाणे घोडे देखील क्वारंटाइन करण्यात आलं होतं. हा कालावधी सात दिवसांचा होता.
-
२०११ मध्ये जन्मलेली दाजरा ही जर्मन बे होलस्टेनर जातीची घोडी आहे. तिचा रंग तपकिरी आहे.
-
आतापर्यंत दाजरा २३ स्पर्धा खेळली आहे, आणि त्यात ती पाचवेळा जिंकली आहे.
-
फवादला स्पॉन्सर करणाऱ्या एका ग्रुपने दाजरा या घोडीला २०१९ मध्ये खरेदी केले होते. यासाठी त्यांना २,७५,००० युरो (सुमारे दोन कोटी ४३ लाख रुपये) खर्च केलेले.
-
या ग्रुपने फवादसाठी आणखी तीन घोडे खरेदी केले होते. यापैकी दाजरा-४ आणि सेनूर मेडिकॉट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले.
-
दोन्ही घोड्यांची कामगिरी पाहता फवादने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दाजराबरोबर सोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (सर्व फोटो : ट्विटर आणि सोनी लाइव्हवरुन साभार)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”