-
फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला आहे. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. सुरुवातीला ५-९ अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश झाला आहे.
-
दरम्यान, रवीकुमार दहीयाचे वडील राकेश कुमार यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज आम्हाला दिवाळी असल्यासारखे वाटत असल्याचे राकेश कुमार दहिया म्हणाले. तसेच आपला मुलगा गोल्ड मेडल जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
-
रवीने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाचा कुस्तीपटू ऑस्कर टिगुएरोस अर्बनोचा १३-३ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रवीचे वडील राकेश कुमार दहिया यांना आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी कामगिरी करताना पाहायचे आहे. बुधवारी रवीने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
-
बजरंग पुनिया
-
राकेश कुमार दहिया म्हणाले, "आज दिवाळी असल्यासारखे वाटत आहे. रवीने हरियाणा आणि आमचे गाव नहरी व देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. रवीचा विजय हा भारताचा विजय आहे. रवीचा इथपर्यंतचा प्रवास खरचं मोठी गोष्ट आहे. उद्या इतिहास लिहल्या जाईल. रवी आपल्यासाठी सुवर्ण पदक जिंकेल"
-
सोनीपत जिल्ह्यातील जवळपास १५ हजार लोकसंख्येचे नाहरी गाव कुस्तीपटू रवी दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा करीत होते. कारण रवीच्या पदकामुळे गावाचा विकास होईल अशी त्यांना आशा आहे. रवीच्या नाहरी गावातील नागरिकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी धडपडायला लागते.
-
दिवसभरात दोन तास वीजपुरवठा होतो, त्यात सर्व कामे उरकावी लागतात. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठीही योग्य व्यवस्था येथे नाही. गावात फक्त महत्त्वाचे असे एक पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. त्यामुळे रवीने पदक जिंकल्यास गावचे चित्र पालटू शकेल, असं या गावकऱ्यांना वाटतंय. ( photo ani , indian express)

१८ वर्षांपासून एकही हिट चित्रपट नाही; तरीही वर्षाला कोटींची कमाई, गोविंदाची संपत्ती किती?