-
तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे.
-
चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया या गाण्याप्रमाणे भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
-
भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.
-
सुरुवातीला आघाडी घेतलेल्या जर्मनीला भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत पराभवाची धूळ चारली.
-
दरम्यान यलो कार्डमुळे मैदानात एक खेळाडू कमी असल्याने जर्मनीने मोठा निर्णय घेतला होता.
-
भारतीय संघाची खेळी पाहून जर्मनी गोलकीपरशिवाय खेळली.
-
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जर्मनीने भारतासोबत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला.
-
मात्र भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशने अगदी शेवटच्या क्षणी जर्मनीला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवरील प्रयत्न हाणून पाडत भारताला विजय मिळवून दिला.
-
आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते.
-
सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता.
-
मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला
-
भारतीय संघाने हा सामना ५-४ च्या फरकाने जिंकला. यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.
भारताने सांघिक खेळाच्या जोरावर तब्बल ४१ वर्षांनी कांस्यपदकावर नाव कोरलं आहे. (फोटो सौजन्य- ट्वीटर) -
या सामन्यात विजय झाल्यानंतर हॉकी खेळाडूंच्या कुटुंबीयांनी सेलिब्रेशन केले.
-
अनेक खेळाडूंच्या कुटुंबीयांचे आनंदाश्रू थांबता थांबत नव्हते.
-
हॉकीपटूंच्या कुटुबीयांनी ढोल वाजवत घराबाहेर जल्लोष साजरा केला.

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”