-
तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे.
-
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघानं जर्मनीला ५-४ ने पराभूत करत भारताने कांस्यपदक पटकावलं. भारतीय हॉकी संघाच्या विजयात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा अप्रत्यक्षरित्या वाटा आहे.
-
२०१८ मध्ये हॉकी खेळ मरणासन्न अवस्थेतून जात होता. त्यावेळी सहारा इंडियाने भारतीय हॉकीला स्पॉन्सरशिप देण्यापासून माघार घेतली होती.
-
तेव्हा नवीन पटनायकांनी महिला आणि हॉकीच्या दोन्ही राष्ट्रीय संघांना पुढील पाच वर्षासाठी १०० करोड रूपये साईन केले होते.
-
नवीन पटनायक यांच्या हॉकी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ते शाळेत असताना हॉकीचे गोलकीपर होते. त्यांच्याच काळात भारतीय हॉकीने माईलस्टोन गाठला होता.
-
नवीन पटनायक यांनी भारतीय हॉकी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विशेष पाठबळ दिले.
-
२०१७ साली हॉकी इंडिया लीगमध्ये कलिंग लान्सर क्लबला ओडिशा सरकारने स्पॉन्सर केलं. तो क्लब ती स्पर्धा जिंकला.
-
२०१८ साली भुवनेश्वमधील कलिंग स्टेडियममध्ये वर्ल्ड कप पुरूष गटाची फायनल रंगली. वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपदंही ओडिशाने भूषवलं. त्यानंतर फेडरेशन ऑफ हॉकीची सीरीज त्यानंतर ऑलिम्पिक हॉकी क्वालिफायर २०१९ चे सामनेही ओडिशातच रंगले.
-
२०२०चा फेडरेशन ऑफ हॉकीची pro league ही पटनायकांच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वास गेली.
-
२०१८च्या वर्ल्डकपच्या यशस्वी आयोजनानंतर आता २०२३चा पुरूष हॉकी वर्ल्डकपही ओडिशातच होणार आहे, असे फेडरेशन ऑफ हॉकीनं सांगितलं आहे.

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”