-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर आज महिला हॉकी संघाकडेही इतिहास रचण्याची संधी होती. मात्र पराभवामुळे महिला हॉकी संघाचं हे स्वप्न भंगलं. (Photo – Hockey India / Twitter)
-
रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. (Photo – Hockey India / Twitter)
-
सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या भारताने नंतर मात्र मुसंडी मारत आघाडी घेतली होती. मात्र एका गोलमुळे भारताचा पराभव झाला. (Photo – Hockey India / Twitter)
-
राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत अर्जेटिनाने २-१ असं पराभूत केलं होतं. त्यामुळे महिलांना प्रथमच अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं. (Photo – Hockey India / Twitter)
-
साखळी फेरीत ब्रिटनने भारताला ४-१ अशी धूळ चारली होती. त्यामुळे भारताकडे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. (Photo – Hockey India / Twitter)
-
१९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा संघांत चौथे स्थान मिळवले होते. यावेळी सर्वोत्तम कामगिरी करत रेकॉर्ड करण्याची संधी मात्र हुकली. (Photo – Hockey India / Twitter)
-
दरम्यान पराभवानंतर सर्व खेळाडू मैदानावर रडू लागल्या होत्या. स्वप्नभंग झाल्याने त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. (Photo – Hockey India / Twitter)
-
अनेक खेळाडूंपासून ते सेलिब्रिटींनी ट्वीट करत महिला हॉकी संघाला खूप चांगली खेळी केल्याबद्दल अभिनंदन करत धीर दिला. (Photo – Hockey India / Twitter)
-
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन संघाशी संवाद साधला. यावेळी आपुलकीने त्यांनी त्यांची चौकशी केली.
-
"तुम्ही सर्वजण खूप चांगल्या खेळला आहात. तुम्ही गेल्या चार-पाच वर्षांपासून सर्व काही सोडून देत इतका घाम गाळला होतात. जणू काही तुम्ही साधना करत होतात," असं सांगत मोदींनी त्यांना धीर दिला.
-
"तुम्ही पदक आणू शकला नसलात तरी आज देशातील करोडो मुलींना प्रेरणा मिळाली आहे. मी संघातील सर्व सदस्य आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन करतो," असंही यावेळी ते म्हणाले. यावेळी खेळाडूंनी पाठबळ दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले.
-
मोदींनी खेळाडूंना निराश होऊ नका सांगत आपुलकीने चौकशी केली.
-
नवनीतच्या डोळ्याला जखम झाल्याबद्दलही मोदींनी चौकशी केली.
-
नवनीतच्या डोळ्याला जखम झाल्याचं मी पाहिलं असं मोदींनी विचारल्यानंतर राणी रामपालने चार टाके लागल्याचं सांगितलं. यावर मोदींनी "अरे बापरे! तिचा डोळा तर ठीक आहे ना?" अशी विचारणा केली.
-
यावेळी मोदींनी वंदना, सलिमा यांचाही उल्लेख करत कौतुक केलं.
-
दरम्यान यावेळी सर्व खेळाडू रडत होत्या. यामुळे नरेंद्र मोदींनी आधी "तुम्ही सर्वांनी रडणं थांबवा, मला आवाज येतोय. देशाला तुमचा गर्व आहे. अजिबात निराश व्हायचं नाही," असं सांगितलं.
-
"कित्येक दशकानंतर तुमच्या मेहनतीमुळे भारताची ओळख पुनर्जिवित होत आहे," असं सांगत मोदींनी धीर देण्याचा प्रयत्न केला. (Photo – Hockey India / Twitter)
-
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिनदेखील यावेळी उपस्थित होते. तेदेखील भावूक झाले होते. (Photo – Hockey India / Twitter)
-
मोदींनी त्यांच्याशी संवाद साधताना तुम्हीदेखील शर्थीचे प्रयत्न केले. तुम्ही कशा पद्धतीने त्यांना पाठबळ देत आहात मी पाहिलं म्हणत मोदींनी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. (Photo – Hockey India / Twitter)
-
"मीदेखील त्यांना तुम्ही देशाला प्रेरणा दिली असून हे खूप महत्वाचं असल्याचं सांगितलं आहे," असं शोर्ड मरिन यांनी मोदींना सांगितलं. (Photo – Hockey India / Twitter)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा