-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत ५ पदके जमा झालेली आहेत. पण शनिवारी भारताला आणखी काही पदके मिळण्याची शक्यता आहे. भालाफेक स्पर्धेत सर्वात लांब लांब भाला फेकणाऱ्या नीरज चोप्राकडून अंतिम फेरीत सुवर्ण पदक मिळण्याची आशा आहे. तर दुसरीकडे महिला गोल्फर अदिती अशोकही सुवर्ण पदक मिळवू शकते. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला आहे. मात्र अद्यापही त्याच्याकडून कांस्यपदकाची आशा कायम आहेत. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
गोल्फर अदिती अशोकने जबरदस्त कामगिरी करत तिसऱ्या फेरीनंतर दुसरे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे अदितीकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. आज टोक्योच्या कासुमिगासेकी कंट्री क्लबमध्ये महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्लेची तिसरी फेरी झाली. या फेरीत अप्रतिम कामगिरी करत तिने स्पर्धेमध्ये स्वतःची जागा आणि पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत
-
अदिती आज झालेल्या सामन्यात ५ बर्डी घेऊन १२-अंडर २०१ वर दुसऱ्या स्थानावर आली. ती अमेरिकेची गोल्फर आणि जगातील पहिल्या क्रमांकाची गोल्फर नेली कोरडा हिच्या १ स्ट्रोक मागे आहे. (फोटो सौजन्य-AP)
-
अदितीने उत्कृष्ट खेळत पहिल्या दिवशी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर कामगिरीत सातत्य राखत तिने स्थान टिकवून ठेवले आहे. (Reuters Photo)
-
अदिती इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या काळात त्याची आई सुद्धा त्याची सावली म्हणून तिच्या सोबत आहे. वास्तविक अदितीची कॅडी (गोल्फच्या खेळात खेळाडूबरोबर गोल्फ स्टीक घेउन जाणारी व्यक्ती) तिची आई माहेश्वरी अशोक आहे. (फोटो सौजन्य- @OlympicGolf)
-
वयाच्या ५ व्या वर्षापासून गोल्फ खेळणाऱ्या अदितीने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले होते आणि त्यावेळी तिचे वडील कॅडी होते. पण यावेळी तिची आई तिची बॅग घेऊन जात आहे. (फोटो सौजन्य- @OlympicGolf)
-
भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने आपल्या पहिल्याच प्रयत्नात थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. अ गटातील पात्रताफेरीमधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आलाय. कामगिरीच्या आधारे ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार थेट अंतिम फेरीत पोहचला आहे. (फोटो ट्विटरवरुन साभार)
-
नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला तब्बल ८६.६५ मीटरपर्यंत गेला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अ गटामध्ये नीरज १५ व्या स्थानी होता. विशेष म्हणजे नीरजने ही कामगिरी पहिल्याच प्रयत्न केली. पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ खेळाडूंना प्रवेश अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो.
-
शनिवारी होणाऱ्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची करण्यात येत आहे.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला आहे. बजरंगचा सामना तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अझरबैजानच्या हाजी अलीवशी झाला. या सामन्यात अझरबैजानच्या कुस्तीपटूने बजरंगला १२-५ ने पराभूत केले.
-
दिवसभरतल्या तीनही सामन्यात बजरंगने कमालीचा खेळ केला आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या १५ व्या दिवशी भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने धडाकेबाज सुरूवात केली. पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाने विजय मिळवला होता. बजरंगने किर्गिस्तानचा कुस्तीपटू अरनाजर अकमातालिवचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. (PTI/File Photo)
-
त्यानंतरच्या सामन्यात बजरंग पुनियाने शेवटच्या क्षणी मुसंडी मारत उपांत्य फेरीत धडक मारली होती. बजरंगची इराणचा कुस्तीपटू आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या मोर्तेजा घियासी यांच्यासोबत लढत झाली होती. सामन्याच्या सुरुवातीलाच घियासीने आघाडी घेतल्यानं भारतीयांचा श्वास रोखला गेला. मात्र, शेवटच्या काही क्षणात बजरंगने चपखलपणे घियासीला चितपट केलं आणि सामना आपल्या नावे केला. या विजयाबरोबरच बजरंग पुनियाने उपांत्य फेरीत धडक मारली होती. (Source: bajrangpunia60/Instagram)
-
मात्र बजरंग पुनिया आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला. अझरबैजानच्या कुस्तीपटूने बजरंगला १२-५ ने पराभूत केले होते. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक विजेता असलेल्या मोर्तेजा आणि बजरंगमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली होती. (File Photo/PTI)
-
बजरंग सेमीफायनमध्ये जरी हरला असला तरी शनिवारी कांस्य पदकासाठी मॅटवर उतरणार आहे. (PTI Photo)
-
जर भारत या तिन्ही खेळांमध्ये यशस्वी झाला तर एकूण पदकांची संख्या ८ वर पोहचेल. जर असे झाले तर भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात जास्त पदके या ऑलिम्पिकमधून मिळणार आहेत. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ६ पदके मिळाली होती.

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”