-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची गोल्फपटू आदिती अशोकनं भारताला पदकाची आशा निर्माण केली होती. (फोटो – आदिती अशोक फेसबुक)
-
रिओ ऑलिम्पिकमध्ये ४१व्या स्थानी राहणाऱ्या आदिती अशोककडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
आदितीनं आपली जिगरबाज खेळी करत चर्चेपासून दूर राहून देखील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
गोल्फमध्ये आदितीनं दिग्गजांना कडवी झुंज देत रिओमधील ४१व्या स्थानाचा इतिहास पुसून टाकला आणि नवा इतिहास घडवला! (फोटो – आदिती अशोक फेसबुक प्रोफाईल)
-
आदितीचं आणि पर्यायाने भारताचं गोल्फमधल्या पहिल्या वहिल्या पदकाचं स्पप्न जरी भंगलं असलं, तरी आदितीनं अशोकनं चौथं स्थान राखत आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोल्फपटूनं ऑलिम्पिकमध्ये केलेली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
तिसऱ्या राऊंडपर्यंत आदिती अशोक दुसऱ्या स्थानी होती. त्यामुळे जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी या अनुक्रमे सुवर्ण पदक आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना तिनं चांगलीच धडकी भरवली होती. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
सध्या आदिती अशोक जागतिक क्रमवारीत २०० व्या स्थानी आहे. मात्र, ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या जोरावर तिची क्रमवारी सुधारण्याची शक्यता आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
२३ वर्षीय आदिती अशोक मूळची बंगळुरूची असून वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने गोल्फ खेळायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, तिच्या कुटुंबीयांपैकी कुणाचाही गोल्फशी संबंध नव्हता. (फोटो – आदिती अशोक फेसबुक प्रोफाईल)
-
आदिती अशोक आपल्या कुटुंबीयांसोबत हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाताना बाहेरच्या गोल्फ कोर्टवरील ड्रायव्हिंग रेंजविषयी तिच्या मनात उत्सुकता चाळवली जायची. तेव्हा लहानपणी तिच्या पालकांनी तिच्याशी घरच्या घरीच गोल्फ खेळायला सुरुवात केली. (फोटो – आदिती अशोक फेसबुक प्रोफाईल)
-
आदिती अशोकनं आत्तापर्यंत तीन वेळा लेडिज युरोपिअन टूर (LET) ही स्पर्धा जिंकली आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
हिरो वुमन्स इंडिया ओपन ही आदिती अशोकची अशी पहिली व्यावसायिक स्पर्धा होती जी तिनं जिंकली होती. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
या वर्षाच्या सुरुवातीलाच आदिती अशोकला मोठा झटका बसला होता. करोनाची लागण झाल्यामुळे तिला भारतात गरजेपेक्षा जास्त काळ वास्तव्य करावं लागलं होतं. त्यामुळे सरावासाठी तिचा वेळ कमी झाला होता. (फोटो – आदिती अशोक फेसबुक प्रोफाईल)
-
करोनामुळे आदिती अशोकला LPGA क्लासिक टूरला देखील मुकावं लागलं होतं. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
आदितीच्या बाबतीत एक रंजक बाब म्हणजे तिचे वडिल तिच्यासाठी नेहमीच कॅडिंग करतात. २०१६ साली रिओमध्ये तिचे वडील कॅडिंग करताना दिसले होते. (फोटो – आदिती अशोक फेसबुक प्रोफाईल)
-
यंदा मात्र आदिती अशोकसाठी तिची आई कॅडिंग करताना दिसत आहे. कारण रिओच्या वेळी तिनंच आईला वचन दिलं होतं की पुढच्या ऑलिम्पिकला तिची आई तिच्यासाठी कॅडिंग करेल. (फोटो – आदिती अशोक फेसबुक प्रोफाईल)
-
रिओ ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकची तब्बल ४१व्या स्थानावर घसरण झाली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आदितीनं ४१ व्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. (फोटो – आदिती अशोक फेसबुक प्रोफाईल)
-
आदिती अशोकनं जागतिक क्रमवारीत २०० व्या स्थानी असूनही जगातील तीन अव्वल खेळाडूंना टक्कर दिली! (फोटो – आदिती अशोक फेसबुक प्रोफाईल)
-
आदितीला पदक जरी जिंकता आलेलं नसलं, तरी तिनं ऑलिम्पिक गोल्फमध्ये आपला अमीट असा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आदिती खऱ्या अर्थानं 'हार के भी बाजीगर' ठरली आहे! (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक