-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरु आहे.
-
नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटाकवलं आहे.
-
भारताचा २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केलीय.
-
सध्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.
-
सर्वसामान्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकजण नीरज चोप्राच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारावले आहेत.
-
नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटरपर्यंत भाला फेकला. हीच कामगिरी निर्णायक ठरली.
-
दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
-
२३ वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने एकंदरीतच इतिहास घडवला.
-
यानंतर सोशल मीडियावर नीरज चोप्राचं कौतुक करणाऱ्या पोस्ट, ट्वीटस पडत आहेत.
-
नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक मीम्स बनवले आहेत.
-
सध्या हे मीम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
या मीम्समध्ये अनेकांनी क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत नीरज चोप्राची तुलना केली आहे.
-
तर काहींनी भालाफेक करतेवळी नीरजचे फोटो विविध पद्धतीने मीम्स बनवले आहेत.
-
सध्या नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरी नेटकरी सुसाट पाहायला मिळत आहेत.
-
त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा महापूर पाहायला मिळत आहे.
-
भालाफेकपटू नीरज चोप्रा हा शोपीस इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा देशातील पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट ठरला आहे.
-
१३ वर्षांनी भारताच्या खात्यात ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नोंद झाली.
-
भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दौन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली.
-
भारताचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
-
यापूर्वी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदकांवर नाव कोरले होते.

सरकारचा मोठा निर्णय! हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत: मंजुरी, माजी न्या. शिंदेंचा मनोज जरांगेंना शब्द