-
भारताच्या २३ वर्षीय नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आणि इतिहास रचला. भारतासाठी हा मोठा सुवर्णक्षण ठरला.
-
नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला आहे. नीरजच्या विजयानंतर ३ तासांनी १४.७५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
-
यात राज्य सरकारपासून ते रेल्वे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने हे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
-
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नीरजला 6 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच त्याला क्लास वन ऑफिसरची सरकारी नोकरीही दिली जाणार आहे.
-
त्यासोबतच नीरज चोप्रा वास्तव्यास असलेल्या पंचकुला शहरातही खेळाडूंसाठी एक केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राचा नीरज हा प्रमुख असेल. तसेच नीरजला 50 टक्के सवलतीच्या दरात जमीनही दिली जाणार आहे.
-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने नीरज चोप्राला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर बीसीसीआयने रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू आणि रवीकुमार दहिया यांना 50 लाख रुपये दिले जाणार आहे.
-
तर कांस्यपदक विजेते पी.व्ही. सिंधू, लवलिना बोरगोहेन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यासोबतच क्रिकेट बोर्ड हॉकी पुरुष संघाला 1.25 कोटी रुपये दिले जाणार आहे.
-
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नीरज चोप्राला 2 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. एक सैनिक म्हणून नीरजचा देशाला अभिमान दिला आहे. त्याचे यश ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी दिली.
-
त्यासोबतच मणिपूर सरकारने नीरजला एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी याबाबतची माहिती दिली.
-
रेल्वेने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. रेल्वेकडून सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला 3 कोटी आणि त्यांच्या प्रशिक्षकाला 25 लाख रुपये दिले जाणार आहेत.
-
त्याशिवाय रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूला 2 कोटी आणि प्रशिक्षकाला 20 लाख दिले जातील. कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 1 कोटी आणि प्रशिक्षकाला 15 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.
-
तसेच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 7.5 लाख रुपये दिले जाणार आहे. तसेच क्रीडा मंत्रालय खेळाडूंना रोख बक्षीसही देणार आहे.
-
भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (IOA)सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला 75 लाख रुपये दिले जाणार आहे. तर रौप्यपदक जिंकण्यासाठी 40 लाख रुपये, तर कांस्य जिंकण्यासाठी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
-
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने नीरज चोप्राला त्यांची आगामी XUV700 SUV गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
त्याशिवाय सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला चेन्नई सुपर किंग्सकडून एक कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. त्यासोबतच चेन्नई सुपर किंग्सकडून 8758 क्रमांकाची एक विशेष जर्सी तयार केली जाणार आहे.

Maharashtra Heavy Rain Alert : मध्य व हार्बरपाठोपाठ पश्चिम रेल्वे देखील ठप्प! रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा