-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत नवा इतिहास रचला आहे. यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला गेला आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये असे अनेक भारतीय खेळाडू आहेत ज्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि थोडक्यात पदक हुकलं. अन्यथा भारताची पदकांची संख्या आज जास्त असती.
-
आदिती अशोक – टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकच्या रुपानं गोल्फ प्रकारात भारताला पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. तिसऱ्या राऊंडपर्यंत आदिती तमाम भारतीयांच्या अपेक्षेला अगदी खरी उतरली. मात्र, मध्येच खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि आदिती तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली.
-
त्यामुळे ७२ होल्सच्या खेळानंतर आदितीला अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मात्र, पहिल्या तीन राऊंड्समध्ये आदिती दुसऱ्या स्थानावर कायम होती. आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोल्फपटूला ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही.
-
वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणाऱ्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरलं. तर न्यूझीलंडच्या लिडिओ कोनं ब्राँझ मेडल जिंकलं. चौथ्या क्रमांकावर राहिल्याने अदितीचं पदक हुकलं.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आले. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
-
दरम्यान महिला हॉकीचा संघ जरी हरला असला तरी त्यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान पटकावलं आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
दिपा कर्माकर हे नाव आज भारतामधील क्रिडा प्रेमींच्या तोंडावर आहे. ग्लास्गो येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत २०१४ साली कांस्य पदक जिंकून दिपाने आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्टची अंतिम फेरी गाठत तिने इतिहास रचला होता.
-
ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दिपा पहिली भारतीय महिला ठरली. मात्र अगदी छोट्या फरकाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाने तिला हुलकावणी दिल्याने तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
-
भारताला ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज म्हणून अभिनव बिंद्राची ओळख आहे. २०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत पाचव्यांदा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरलेल्या बिंद्राला यावेळी पदकाने अखेरच्या क्षणी हुलकावणी दिली होती.
-
बिंद्राने २००८ मध्ये बीजिंग येथे रंगलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली होती. ही पुनरावृत्ती रिओ ऑलिम्पिकच्या मैदानात करण्यास बिंद्रा अपयशी ठरला होता.
-
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याला १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाने अवघ्या ०.५ गुणांच्या फरकाने हुलकावणी दिली होती. पात्रता फेरीत ७ वे स्थान प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविलेल्या अभिनव बिंद्राला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
-
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या जोडीला २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला अद्याप ऑलिम्पिकमधून येणाऱ्या एका टेनिस पदकाची प्रतिक्षा कायम आहे.
-
भारतीय नेमबाज जॉयदीप कर्माकर याला पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रॉन प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
-
२००४ ऑलिम्पिक हे वर्ष भारतातील टेनिस चाहत्यांसाठी आणखी एक दु:खाचे वर्ष ठरले. लिअँडर पेस आणि महेश भूपती या जोडीने या स्पर्धेत पहिल्या तीन फेऱ्यात सहज विजय मिळवला. मात्र त्यानंतर त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागले.
-
वेटलिफ्टिंगपटू कुंजराणी देवी यांना २००४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
-
भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी धावपटू म्हणजे पी.टी. उषा. १९८४ मध्ये लॉस एंजलिस ऑलिम्पिक पदक जिंकण्याची संधी हुकली होती. उषा यांना १९८४ सालच्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.
-
1980 च्या मॉस्कोच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला यंदाच्या वर्षीप्रमाणेच पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी भारत चौथ्या स्थानावर होता.
-
भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी मिल्खा सिंग यांची ओळख होती. ६ सप्टेंबर १९६० साली ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ४०० मीटर शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी ०.१ सेकंदानं त्यांचं कास्य पदक हुकलं होतं. त्या स्पर्धेत कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय ते धावले होते.
-
भारतीय पुरुष फुटबॉल संघ सध्या फिफा क्रमवारीत पहिल्या १०० मध्येही दिसत नाही. मात्र एकेकाळी भारतीय फुटबॉल संघ आशियातील सर्वोत्तम संघांपैकी एक होता. १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता.
-
कुस्तीपटू रणधीर शिंदे यांनी १९२० मध्ये अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये ६० किलो फेदरवेट फ्री स्टाईल गटात भाग घेतला होता. त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांनी या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र उपांत्य फेरीतील सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना चौथे स्थानावर समाधान मानावे लागले होते. (फोटो सौजन्य – ट्वीटर)

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”