करोनाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांची आज रविवारी सांगता झाली. भारताच्या खेळाडूंनी टोक्योत इतिहास रचला आणि आजपर्यंत सर्वाधिक पदके जिंकली. ऑलिम्पिकचा समारोप सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. समारोप समारंभाची सुरुवात १७ दिवसांच्या कार्यक्रमांचा सारांश असलेल्या व्हिडिओने झाली. या सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी करणयात आली. भालाफेकपटू नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने तिरंगा उंचावला आणि समारोपाच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्याच्यासोबत आणखी काही भारतीय खेळाडू देखील उपस्थित होते, जे सेल्फी घेताना दिसले. ऑलिम्पिकच्या आयोजकांनी 'अरिगातो' म्हणत सर्वांचे आभार मानले. समारोपाच्या सोहळ्यात सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आले. अनेक खेळाडूंनी हसत, खेळत टोक्योचा निरोप घेतला. पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस येथे २०२४ला होणार आहेत.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा